धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर आ.राणापाटलांचेच वर्चस्व
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ.कैलास पाटील यांना धक्का
४ जागा बिनविरोध तर ९ पैकी ८ जागा मोठ्या फरकाने जिंकल्या
धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर स्थापनेपासून डॉ पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व होते.पुढे त्यांचे चिरंजीव व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यावर आपली सत्ता कायम ठेवली.२०२५-२०२९ च्या पंचवार्षिक निवडणुक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती एक मतदार थेट दिल्लीहून विमानाने आणला होता मात्र आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी आखलेल्या रणनितिपुढे त्यांचे कांही चालले नाही.या निवडणुकीत आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल चे १३ पैकी १२ उमेदवार निवडून आले.आ.पाटील यांना भूम,परांडा व वाशी जागांच्या बाबतीत कायम महायुतीच्या पॅनेल सोबत राहण्याचा शब्द दिल्याने तीन जागा सुरुवातीला बिनविरोध काढण्यात आल्या होत्या.यासोबतच तुळजापूरची जागा देखील बिनविरोध काढण्यात आ.पाटील यांना यश मिळालं होतं.उर्वरित ९ जागासाठी निवडणूक झाली होती त्यात लोहाऱ्याची जागा महाविकास आघाडीने केवळ १ मताने जिंकली व आ.पाटील यांच्या पॅनल च्या ८ जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या.
निकाल घोषित झाल्यावर मिरवणूक काढण्यात आली व भाजप भवन येथे आ.पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, जेष्ठ नेते मिलींद पाटील,नितीन काळे,नेताजी पाटील,गफ्फार काझी,राजाभाऊ पाटील,विकास बारकुल,रामहारी शिंदे,उत्तमराव टेकाळे,उद्धव पाटील,अनंतराव देशमुख,बालाजी गावडे,राजाराम कोळगे,राजसिंहा राजेनिंबाळकर,मनोगत शिनगारे, राजभाऊ सोनटक्के यांच्यासह महायुतीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.