*रेखाताई गुंजकर-कदम यांचा अभिनेते स्वप्निल राजशेखर व अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांच्या हस्ते सन्मान
* कोल्हापुरात पुरस्काराचे वितरण*
* महाराष्ट्राच जिद्द फाउंडेशनचा उपक्रम
ढोकी: (सा
संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील रेखाताई गुंजकर-कदम यांना राष्ट्रीय लक्षवेध सामाजिक संमेलनात राजमाता जिजाऊ कर्तृत्व पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते रविवार दि.20 रोजी कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संस्था.महाराष्ट्र जिद्द फाऊंडेशन 2025 कोल्हापूर आयोजित राष्ट्रीय लक्षवेध सामाजिक संमेलन यांच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या महिलांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते आपण आपल्या कार्य कर्तृत्वाने प्रगल्भ समाजनिर्मिती करुन कृतीशील गुणवत्ता समाजासमोर आणत आहात तसेच तुमच्या समाजभिमुख कार्याचा गौरव करून रेखाताई गुंजकर-कदम यांना राजमाता जिजाऊ कर्तृत्व पुरस्कार सुप्रसिध्द अभिनेते स्वप्निल राजशेखर,सुप्रसिध्द अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आला हा पुरस्कार शाजर्षी शाहु महाराज नाट्यगृह दसरा चौक कोल्हापूर येथे देण्यात आला यावेळी जिद्द फाऊंडेशनच्या अध्यक्षा गितांजली डोंबे,डाॅ खरात,पञकार सुरेश कदम,सानिका कदम,सार्थक कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते रेखाताई गुंजकर-कदम यांचे सर्वञ आभिनंदन होत आहे
रेखाताई गुंजकर-कदम यांचे राजमाता जिजाऊ कर्तृत्व पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करणे खरोखरच कौतुकास्पद आहे. सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्नील राजशेखर आणि अभिनेत्री शुभांगी गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे, हा त्यांच्या कार्याचा योग्य गौरव आहे.
कोल्हापुरात झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती, हे वाचून आनंद वाटला. किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संस्था आणि महाराष्ट्र जिद्द फाऊंडेशन यांचे सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम नेहमीच प्रेरणादायी असतात.
रेखाताई गुंजकर-कदम यांनी आपल्या कार्याद्वारे समाजात निश्चितच सकारात्मक बदल घडवले असतील आणि त्यांची कृतीशील गुणवत्ता इतरांनाही प्रेरणा देत असेल. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!