*पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते*
*महा आवास अभियानाच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन*
धाराशिव, दि. २६ (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी "महा आवास अभियान" योजनेच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.हा कार्यक्रम २६ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आला.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री राणाजगजितसिंह पाटील,कैलास पाटील,प्रविण स्वामी,जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या वेळी "महा आवास अभियान" योजनेचे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले.या भित्तीपत्रकाचे योजना, तिची अंमलबजावणी प्रक्रिया, लाभार्थींसाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ग्रामपंचायतींपासून जिल्हास्तरापर्यंत या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या भित्तीपत्रकाचा उपयोग केला जाणार आहे.