>

चिमुकल्यांनी घेतला वन भोजनाचा आनंद . . .


 

विद्यार्थ्यांना वनभोजनाचा आनंद देणारे एकमेव  छत्रपती शाहू मॉडर्न इंग्लिश स्कूल

मुरुड (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

       मुरुड येथील नामांकित असणाऱ्या श्री छत्रपती शाहू मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या प्री - प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला वन भोजनासह  रोप वाटीका पाहण्याचा आनंद घेतला . लहान मुलांच्या मनामध्ये विविध झाडांविषयी रोपांविषयी असणारी उत्सुकता व ते प्रत्यक्षात त्यांना पहाता यावे या उद्देशाने संस्था अध्यक्ष दिपक झाडके , सचिव प्रा . दत्तात्रय जाधव , कोषाध्यक्ष प्रा . शंकरराव पाटील यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम घेण्यात आला .



     शाळेचे मुख्याध्यापक बाबू थॉमस , उपमुख्याध्यापक उमेश कुंभार , समन्वयक रामेश्वर शेटे यांनी गाड्यांचे पुजन करून पळसप येथील नरवडे रोप वाटीका येथे भेट दिली तसेच विविध छोट्या - छोट्या रोपांची पहाणी करून रोपे तयार करण्यासाठी मशीनचा वापर कसा केला जातो ते ही दाखवण्यात आले . तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसोबत वनभोजन ही केले . या उपक्रमातून विद्यार्थ्यात सहकार्यवृत्ती  , संघटन कौशल्य आदी गुणांची निर्मिती करण्यास हातभार लावला गेला . यावेळी विद्यार्थ्यांसोबत शाळेचे क्रिडा शिक्षक बालाजी भिसे प्री - प्रायमरीच्या समन्वयीका गीता फेरे , ज्योती ढेकणे , रेश्मा कुंभार , महादेवी देशमुख , ज्योती घोंगडे , उषा नाईकनवरे , राऊत मॅडम आदी उपस्थित होत्या . यावेळी नरवडे रोप वाटीकाचे संचालक दयानंद नरवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . सर्व विद्यार्थी आनंदून गेले होते .

Post a Comment

Previous Post Next Post