>

भैरवनाथ शुगर वर्क्स लि. (संचलित)तेरणा शेतकरी सह. साखर कारखाना द्वितीय बॉयलर अग्नि प्रदीपण व मोळी पूजन सोहळा संपन्न ,



 तेरणा शेतकरी सह. साखर कारखाना , भैरवनाथ शुगर वर्क्स लि. (संचलित) द्वितीय बॉयलर अग्नि प्रदीपण व मोळी पूजन सोहळा संपन्न , 

इतर कारखान्या पेक्षा प्रती में टन र.५१/- जास्तीचा ऊसदर

ढोकी(सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

 

    धाराशिव   जिल्ह्यातील ढोकी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. युनिट क्र.-६ चा दूसरा गळीत हंगाम शुभारंभ

 दि. २५-११-२०२४ रोजी कारखान्याचे कार्यकारी संचालक मा.श्री विक्रम उर्फ केशव सावंत यांचे हस्ते सपत्नीकपणे विधिवत पूजा करून संपन्न झाला.


आपल्या जिल्ह्याचे माजी पालक मंत्री तथा आरोग्य मंत्री व लोकप्रिय आमदार मा.प्रा.डॉ. तानजीराव सावंत साहेब यांनी पहिल्याच २०२३-२४च्या गळीत हंगामात शेतकऱ्याना ज्यासतीत ज्यास्त ऊस दर देण्याचा दिलेला शब्द पाळत कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकान्याना परिसरातील कारखान्या पेक्षा उच्चान्की रु.२८२५/- प्रती मे. टन ऊस दर दिलेला आहे. तसेच मा. आमदार प्रा.डॉ. तानजीराव सावंत साहेब यांनी चालू गळीत हंगामात शेतकरी स्नेह मेळाव्यातच परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकाऱ्याना या वर्षीचे गळीत हंगामात इतर कारखान्या पेक्षा प्रती में टन र.५१/- ज्यासतीचा ऊसदर देण्याचे जाहीर केलेले आहे.




आजच्या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री सावंत साहेब यांनी कारखान्यातील सर्व मशीनरी मॅटनन्सची कामे अद्‌यावत पणे पूर्ण केलेली असून गाळप क्षमते प्रमाणे आवश्यक अशी अशी सर्व ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभी करून आपला कारखाना ऊस गाळपसाठी सुसज्ज केल्याचे सांगितले तसेच या प्रसंगी त्यांनी धाराशिव, तुळजापूर कळंब व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकाऱ्याना चालू गळीत हंगामात आपल्या भैरवनाथ शुगर वर्क्स लि. या कारखान्यास जास्तीत ज्यास्त ऊस देण्याचे आवाहन केले.




कार्यक्रमास ढोकी गावचे उपसरपंच श्री अमोल पापा अमुद्रे, शिवसेना तालुकाप्रमुख अजित लाकाळ, गफार काजी, संग्राम देशमुख, दताभाऊ तिवारी, अमोल पाटील, राजपाल देशमुख, राहुल वाकुरे, जे. जे. काजी, एस. के काजी कारखाना परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, तोंडणी वहातूक ठेकेदार सर्व हितचिंतक तसेच कारखान्याचे फॅक्टरी मॅनेजर श्री देशमुख चिफ अकौंटंट श्री बिराजदार चिफ केमिस्ट श्री अवाड मुख्य शेती अधिकारी श्री पुंड, डिस्टलरी मॅनेजर श्री पाटील व श्री शिरसाठ तसेच इतर सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post