>

सर्वांगीण विकासासाठी महायुतीला मतदान करा : दत्तात्रय देवळकर




 सर्वांगीण विकासासाठी महायुतीला मतदान करा : दत्तात्रय देवळकर

कोलेगाव(साप्ताहिक संत गोरोबाकाका समाचार वृत्तसेवा)

कोलेगावची जनता सुज्ञ असून सतत एकाच उमेदवाराच्या पाठीशी उभे राहते मात्र यावेळेस बदल करणे हा त्यांनी ठरवलेला असून महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांना कोलेगाव येथे मताधिक्य मिळणार असे दत्तात्रय देवळकर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले.




‌.   उपरोक्त असे की धाराशिव कळंब मतदारसंघातील महायुती उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचारार्थ कोलेगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यावेळी अजित पिंगळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्तात्रय देवळकर आपल्या प्रास्ताविकात पुढे म्हणाले की, कोलेगावची जनता सुज्ञ असून ती सतत विकासाच्या बाजूने राहते.  यावेळी कोलेगावात नक्की मताधिक्य महायुतीला मिळणार असून यावेळी प्रत्येक गावात असे चित्र असून महायुती ही महाविकास आघाडीपेक्षा सरस राहणार आहे. शासनाच्या प्रत्येक योजना या जनतेच्या हितासाठी आहेत. त्यात लाडकी बहिणी योजना, एक रुपयात पिक विमा, जेष्ठ साठी वयश्री योजना अशा अनेक योजना शासनाने राबविलेल्या आहेत त्याचे श्रेय महायुतीला मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 23 नोव्हेंबरला जनता आशीर्वाद रुपी आम्हाला कौल देईल हे मात्र नक्की होय. कोलेगाव या गावाचा संपर्क कारखान्याच्या जवळ गावात असल्यामुळे सर्वांशी आलेला आहे त्यामुळे कोल्हेगावची जनता महायुतीच्या पाठीशी उभे राहून खंबीरपणे साथ देईल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post