>

विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणार : देवदत्त मोरे


 विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणार : देवदत्त मोरे


महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभावी लढत देणार

कसबे तडवळे (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक लढविणार आहे. प्रत्येक वेळी निवडणुका येतात  सतत जनतेला खोटी आश्वासने देऊन निवडून येतात. मतदार संघातील कळंब धाराशिव चे प्रश्न बरेच प्रलंबित आहेत . त्यामुळे मी जनतेसमोर विकासाचा मुद्दा घेऊन जाणार आहे व जनता मला स्वीकारणार आहे अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे यांनी साप्ताहिक संत गोरोबा काका समाचार प्रतिक्रिया दिली त्यावेळी ते बोलत होते.




     धाराशिव कळंब      मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारामुळे एक प्रकारची उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्यात ती उमेदवारी एक सामान्य कुटुंबातील दमदार व्यक्तिमत्व देवदत्त मोरे यांना मिळालेली आहे. जे की सामाजिक कार्यात सतत सक्रिय असतात गेल्या दहा वर्षापासून ते समाजकारण व राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सतत ते जनतेची सेवा करण्यात मग्न असतात. त्यांच्याशी आपण संवाद साधला ते पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी धाराशिव तालुका राज्य शासनाने दुष्काळ म्हणून जाहीर केला मात्र केवळ शेतकऱ्यांची बोळवण अग्रीम पिक विमा वर केली. पुढे शेतकऱ्याचे उर्वरित पैसे दिले नाहीत. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्याचे आहे की विमा कंपनीची आहे. यांना मी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. तसेच यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान झाले शेतकऱ्यांना अनुदान जाहीर झाले नाही किंवा त्यांच्या खात्यावर आले नाही त्यामुळे हे सरकार फक्त मोठ्या गोष्टी करते. तेव्हा मी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी घेतली आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका लढत आहोत. महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे सत्ता येईल येईल याबद्दल मुळीच शंका नाही. विकासाच्या मुद्द्यावर व मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने मी आमदार होणारच व जनतेच्या न्याय हक्कासाठी सतत लढत राहणार. त्यामुळे विरोधक महाविकास आघाडी महायुती हे कितीही सांगत असले तरी त्यांची सत्ता येणार नाही. असेही ते  म्हणाले.

    त्याचप्रमाणे धाराशिव कळंब 

 मतदारसंघातील रस्त्याविषयी बोलताना ते म्हणाले की, आपल्या मतदारसंघात रस्ते , वीज ,पाण्याची व्यवस्था हे सरकार करू शकत नाही. त्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. तेव्हा या तीन गोष्टीचा मी उलगडा करणार असून त्या सत्ताधाऱ्यांना मी खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. तसेच राज ठाकरे यांचे विकासाचे व्हिजन  असे राहणार की जनतेला हेवा वाटणारा महाराष्ट्र ते घडविणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सर्वांनी साथ द्या असेही ते शेवटी म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post