>

प्रतापसिंह पाटील यांचा उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल


.प्रतापसिंह पाटील यांचा उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

 धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
 -मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून  कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यावेळी सोबत अतुल गायकवाड,बलराज रणदिवे,योगेश सोन्ने पाटील यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

 मनोज जरंगे पाटील हे येत्या दोन दिवसात  उमेदवार निश्चित करणार असून उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात अनेक इच्छुक आहेत. या सर्व इच्छुकांनी एकत्र येत आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्येच धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या ठिकाणी उमेदवार कोण असणार याची उत्सुकता देखील शिगेला पोहचली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post