>

तेरणा कारखाना,जिल्हा बँक, दूध संघ,कोणी लूटला,जिल्हा दरिद्री कोणामुळे,याबाबत नागरिकांची जागृती झाली तरच निवडणूक लढवू :राहुल वाकुरे पाटील


 

तेरणा कारखाना,जिल्हा बँक, दूध संघ,कोणी लूटला,जिल्हा दरिद्री कोणामुळे,याबाबत नागरिकांची जागृती झाली तरच निवडणूक लढवू 

               : राहुल वाकुरे पाटील

अध्यक्ष तेरणा संघर्ष समिती


ढोकी (साप्ताहिक संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना तेरणा कारखाना अवघ्या दोन कोटी सोळा लाख रुपयात उभा राहिला अतिशय काटकसर करून दळणवळणाची साधने नसताना लाईट रस्ते इतर सुविधा नसताना किसन तात्या समुद्रे शिवाजीराव नाडे बाबुराव वाकूरे त्यावेळी चे खासदार तुळशीराम पाटील यांनी उभा केला या कारखान्याच्या पुढील काळात  येणाऱ्या प्रत्येक संचालक मंडळाने प्रचंड भ्रष्टाचार करून मनमानी कारभार करून ज्याला जमेल तसा लुटून 400 कोटी कर्ज करून हा कारखाना बंद पडला गेली दहा वर्षापासून या भागातील शेतकरी होरपळून निघत आहे हाल आपष्ट सोसत आहे इतर कारखानदाराला ऊस देत आहे 

ज्यानी तेरनेत लुटून आपले संपत्ती उभा केली सत्ता  उपभोगली मोठी मोठी पदे उपभोगली त्यांनी हा तेरणा चालू करण्यासाठी पुढाकार घेतला नाही ज्यांनी या जिल्ह्याच्या सहकारी संस्थाची वाट लावली जिल्हा बँक लुटून खाल्ली,दूध संघ बंद पडला या जिल्ह्याचे वाटोळे केले त्यांनाच आपण परत परत निवडून देत आहात आपल्या बाजूला लातूर जिल्हा सुधारला आपल्या बाजूला सोलापूर जिल्हा सुधारला आपला जिल्हा का सुधारत नाही याचा जाब आपण या पुढार्‍यांना विचारला पाहिजे लातूर जिल्ह्यातील एमआयडीसीत लाखो तरुणांच्या हाताला काम मिळते सोलापूर जिल्ह्यात एमआयडीसी लाखो तरुणांना काम मिळते पण आपल्या जिल्ह्यात रोजगार निर्मिती झाली नाही आपल्या जिल्ह्यात लाखो तरुण बेरोजगार आहेत लाखो तरुण पुणे मुंबईला कामानिमित्त स्थलांतर झाले याला जबाबदार फक्त येतील नाकर्ते पुढारी आहेत तरी आपण या पुढार्‍यांना पिड़या ना पिड्या  निवडून देत आहोत हा धाराशिव जिल्हा  दरिद्री नसून या जिल्ह्याला जिल्ह्यातील ज्या पुढार्‍यांनी विकास केला नाही ते पुढारी दरिद्री आहेत या पुढार्‍यांनी तेरणातील कारगिल निधी खाल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा निधी जमा केलेला खाल्ला, रूपांतरित ठेवी 400 कोटी मोडून खाल्ल्या, जिल्हा बँक खाल्ली दूध संघ खाल्ला ज्याला जमेल तसे त्यांनी या जिल्ह्यातील संस्था खाल्ल्या व हा धाराशिव जिल्हा देशोधडीला लावला जोपर्यंत येथील मतदार यासाठी जागृत होत नाही तोपर्यंत या भागात निवडणूक लढवणे शक्य नाही नागरिक मतदार जर जागृत झाले तरच निवडणूक लढण्याचा विचार करू.



ज्यांच्याकडे सत्ता होती संपत्ती होती कार्यकर्ते होते त्यांनी तेरणा साखर कारखाना चालू करण्यासाठी दहा वर्षे बंद असलेला कारखाना चालू करण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे होता पण प्रत्यक्षात तसे झाले नाही माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणांना हा तेरणाचा लढा उभा करता आला तुम्हाला का उभा करता आला नाही असा सवाल राहुल वाकुरे यांनी जनसंवादशी बोलताना या जिल्ह्यातील ज्यांनी ज्यांनी तेरणा लुटला तेरणच्या माध्यमातून संपत्ती गोळा केली सत्ता उपभोगली मोठे मोठे पदे उपभोगले या जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची वाटोळ केली हा जिल्हा दरिद्री ठेवला त्यांना विचारला

Post a Comment

Previous Post Next Post