सौ. सरोजिनीताई राऊत या सुद्धा असू शकतात महायुतीच्या संभाव्य उमेदवार...!
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
डॉ.सौ . सरोजिनीताई राऊत या सुद्धा असू शकतात महायुतीच्या संभाव्य उमेदवार सुद्धा असू शकतात महायुतीच्या संभाव्य उमेदवार यामुळे मतदार संघात चर्चा सुरू झालेली आहे. कारण महायुती सरकारची प्रत्येक योजना त्यांनी प्रत्येक मतदाराच्या घरी नेऊन पोचवलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा पक्ष त्यांना उमेदवारी देण्यासाठी ही त्यांची चर्चा सुरू झालेली आहे. नक्की होय.
.
धाराशिव कळंब मतदारसंघ हा दोन तालुक्याचा मतदार संघ आहे. या मतदारसंघावर महाविकास आघाडीचा जरी धबधबा असला तरी २०२४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ सरोजिनीताई राऊत या असल्या तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येऊ शकतो.
आज आपण विचार केलेला तर सौ .सरोजिनीताई राऊत यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात जनजागृती करण्याचे काम केलेले आहे. प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचे काम देखील त्यांच्या बहुउद्देशीय संस्थेमार्फत करण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ कोलेगाव तालुका जिल्हा धाराशिव येथे गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याबद्दल देखील त्यांनी मार्गदर्शन केलेले होते. त्याचप्रमाणे वृक्ष लावा आपल्या दारी या अनुषंगाने त्यांनी प्रत्येक वृक्षाचे रोप प्रत्येक गावात वाटप केलेले आहे. जेणेकरून वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनसरी प्रचार केलेला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मार्फत लाभार्थ्यांना त्यांनी सर्व काही अडचणी दूर करण्याचे काम देखील केलेले आहे. त्यातील लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेणे व शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करणे याचे देखील त्यांनी नियोजन केलेले आहे. व त्या अनुषंगाने लाडकी बहीण योजनेला सुद्धा भरभरून प्रतिसाद जनतेतून देण्यात आला. जर आपण विचार केला तर वयश्री योजनेमार्फत लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेऊन शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून त्यांना देखील न्याय देण्याचा प्रयत्न
सौ सरोजिनीताई राऊत यांनी केलेला आहे.
त्याचप्रमाणे धाराशिव कळंब मतदारसंघात अतिवृष्टीने थैमान घातले त्यावेळेस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केलेली आहे. व लवकरच शासनाला त्या अतिवृष्टीचे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिक विमा सुद्धा देणार आहे. जवळपास त्यांच्या कार्यातून ३२००० रोपांचे वाटप झालेले आहे. एवढे सामाजिक कार्य आज कोण करत नाही मात्र त्यांनी करून दाखवले. हे सुद्धा पाहणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या देशातील थोर महिलांचा आदर्श घेऊन त्या आज पुढे पाऊल टाकत आहेत. कारण प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांनी जे कार्य केलेले आहे त्याला जनता हमेशा प्रतिसाद देणार आहे.
त्यांनी केलेले महत्त्वाचे काम म्हणजे ग्रामीण भागातील जो शैक्षणिक पाया असतो तो त्यांनी भक्कम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार केला तर आज तरी
सौ .सरोजिनीताई राऊत यांचे कार्य हे अत्यंत चांगल्या रीतीने आहे त्यामुळे त्यांना जर महायुतीने उमेदवारी दिली तर ते नक्कीच विजय होतील हे आज चित्र दिसत आहे.