>

लोकांसाठी मी सदैव काम करतो हीच माजी खरी संपत्ती आहे: माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे




 लोकांसाठी मी सदैव काम करतो  हीच माजी खरी संपत्ती आहे: माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे


मी पक्षाचा, पक्ष माझा म्हणून म्हणून २०१९ ची राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नाकारली


धाराशिव:(सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)


 मी लोकांसाठी अर्ध्या रात्री कामाला येतो कारण हीच खरी माझी संपत्ती आहे. पक्ष व कार्यकर्ता माझ्यासाठी सर्वस्व आहे आतापर्यंत पक्ष जो जिम्मेदारी दिली मी निभावलेली आहे यापुढे सुद्धा मी निभावणार आहे. त्यामुळे आज या प्रसंगी मी हेच सांगतो आज मला तुम्ही प्रेम दिले ते मी कधीच विसरणार नाही. माझ्या सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर हा  कार्यक्रम घेत आहे. त्यामुळे मला कुठलीच लालसा नाही. आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण उपस्थित आहेत हे ऋण मी कधीच विसरणार नाही.

    सविस्तर वृत्त असे की परिमल मंगल कार्यालय येथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळी त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर तुळजापूरचे  

आ. राणाजगजीतसिंह पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजी राजे चालुक्य, तसेच भारतीय जनता पार्टीचे  माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते

ॲड मिलिंद पाटील. जिल्हा सरचिटणीस व्यंकटराव गुंड, नगरसेवक इंद्रजीत देवकते, प्रदेश कार्यकारी सदस्य   प्रवीण पाठक, भारतीय जनता पार्टी जिल्हा  उपाध्यक्ष ॲड नितीन भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

     धाराशिव येथे परिमल मंगल कार्यालय येथे नितीन जी काळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नितीनजी काळे पुढे म्हणाले की, मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे व पक्षाने मला वेळोवेळी जिम्मेदारी दिली ती मी पार पाडली व पुढेही पार पाडणार आहे. पक्षासाठी कार्य करताना केव्हाही दिवस रात्र पाहत नाही सतत पक्षाचा कार्यकर्ता असो की मला कुणी केलेला फोन असो त्यासाठी मी सदैव तत्पर असतो. माझी खरी संपत्ती माझे लोक आहेत. त्यासाठीच मी समाजकार्यात स्वतःला झोकून दिले आहे. त्यामुळे मला पदाची कुठलीच लालसा नाही. व कुठलीच केव्हाही अपेक्षा केली नाही.  धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्याचे काम मी केलेले आहे. त्यामुळे आज जो अभिष्टचिंतन सोहळा आहे तो माझ्या सहकार्याच्या आग्रहातर घेण्यात आलेला आहे. त्यावेळी आपण सर्वजण येथे उपस्थित आहात त्याचे ऋण मी कधीही विसरणार नाही. २०१६ रोजी मी नगराध्यक्ष निवडणुकीत उभा राहिलो होतो त्यावेळेस धाराशिव च्या जनतेने मला भरभरून प्रतिसाद दिला मात्र थोड्या मताधिकांनी माझा पराभव झाला तो मी स्वीकारला व पुढे पक्षाचे कार्य  सुरू केले.  आ. राणाजगजीत सिंह पाटील यांनी जर मला साथ दिली असती तर तेव्हा मी निवडून आलो असतो असेही ते म्हणाले.

    तसेच पुढे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आपल्या मनोगत म्हणाले की, नितीन काळे हे लोकांच्या कामासाठी अहोरात्र काम करतात तसेच कुठलेही आंदोलनातील सदैव पुढे असतात. त्यामुळे जनसामान्यांचे नाळ त्यांच्याशी जुळली आहे. त्यांची कुठलीही संस्था नाही मात्र ते सदैव लोक च्या संपर्कात असतात हीच खरी त्यांची ताकद आहे असेही ते म्हणाले.


भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते

ॲड. मिलिंद पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की जर नितीन काळे यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना अवश्य निवडून आणू. कारण कमळ चिन्ह असलेला उमेदवार हा पक्षाचा उमेदवार असतो त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे २०१६ ची निवडणूक ही नितीनजी काळे यांनी खरोखरच चांगली लढवली आता त्यांना संधी मिळाली तर त्याचे नक्कीच सोने होईल असे ते म्हणाले.

      त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य ते पुढे म्हणाले की राज्यपाल नियुक्त आमदारासाठी  सहा लोकांची यादी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस  यांना दिलेली आहे त्यात एकाची वर्णी लागेल असे ही ते म्हणाले. जो पक्षाचा काम करील त्यालाच उमेदवारी मिळणार आहे असेही ते म्हणाले. त्यामुळे  हे वाक्य सर्वांना आश्चर्यचकित करणारे असलेले देखील दिसून येत आहे.

  शेवटी अध्यक्षीय समारोप करताना

 आ. राणाजगजीतसिंह पाटील पुढे म्हणाले की, त्यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व आई तुळजाभवानी च्या चरणी प्रार्थना करतो की त्यांची इच्छा ही पूर्ण व्हावी.

   या अभिष्टचिंतन कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व  काळे साहेबावर  प्रेम करणारे लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मैंदर्गी यांनी केले तर आभार प्रदर्शन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post