आर.पी.कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये करिअर अपॉर्च्युनिटी आणि अंडरस्टँडिंग ऑफ मेडिकल कोडिंग या विषयावरती एकदिवशीय कार्यशाळा संपन्न
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
डॉ.वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस गडपाटी धाराशिव येथील आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे विश्वस्त डॉ.प्रतापसिंहजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, करिअर अपॉर्च्युनिटी अँड अंडरस्टँडिंग ऑफ मेडिकल कोडिंग याविषयी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी कोरो हेल्थ इंटरनॅशनल लिमिटेड नोएडा, न्यू दिल्ली येथे कार्यरत असलेले सीनियर मेडिकल कोडर श्री. पराग भारंबे व श्री. प्रतीक बेलसरे यांचे मार्गदर्शन लाभले. या या कार्यशाळेचे प्रस्ताविक करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मेडिकल कोडींग क्षेत्रातील संधी चे महत्व विशद केले. यावेळी बोलत असताना श्री. पराग भारंबे व श्री. प्रतीक बेलसरे यांनी मेडिकल कोडींग मधील वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी तसेच मेडिकल कोडींग मधील रोजगाराच्या संधी आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणते कौशल्य आत्मसात करावे याविषयी विस्तृत असे मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे हे दोघेही आर.पी. कॉलेज ऑफ फार्मसी चे माजी विद्यार्थी आहेत.या कार्यशाळेला महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अस्लम तांबोळी व प्रा. विजय सुतार यांनी परिश्रम घेतले तर आभाप्रदर्शन डॉ.गणेश मते केले.