स्पर्धेच्या युगात फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यासाठी करिअर मार्गदर्शन प्र.कुलगुरु डॉ.पराग काळकर
भोसरी: (सा संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व प्रितम प्रकाश महाविद्यालय भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करियर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरूनीं वरील उदगार काढले. एकविसाव्या शतकात प्रगतीचे उतुंग भरारी घेण्यासाठी विद्यार्थ्यानीं त्यांच्या आवडीनुसारच करिअरच्या वाटा शोधाव्यात. पालकांनी आपली अपुरी राहिलेली स्वप्ने मुलांवरती लादु नयेत. मुलांना त्यांचे आवडीप्रमाणे शिक्षण घेऊ द्यावे. आजआपण या मातीमध्ये जे बीज पेरू तेच भविष्यात उगवणार आहे त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला लेखक, कवी, शिक्षक-प्राध्यापक, इंजिनिअर व्हायचं असेल तर पालकांनी त्यांना होऊ द्यावे असी रास्त अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बार्टी व प्रितम प्रकाश महाविधालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी त्यांनी विचार प्रकट केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या मागील ७५ वर्षाच्या काळात सामान्य माणसाच्या जीवनात सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक बदल घडून आणण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे: विशेषतः विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तथापि आजही बहुसंख्य विद्यार्थी उपलब्ध शैक्षणिक संधीचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्यांना कुठे काय आणि कोणत्या शैक्षणिक संधी उपलब्ध आहेत याबद्दलची पुरेशी कल्पना नाही आणि म्हणून बहुसंख्य विद्यार्थी आजही पारंपारिक आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या प्रकारचे शिक्षण घेताना दिसतात. आधुनिक काळात स्पर्धात्मक युगातील असलेल्या संधीचा लाभ घेण्याइतपत क्षमता त्यांच्या विकसीत झालेल्या नाहीत. काळसुसंगत शिक्षण घेतले नसल्याने करियर करण्यासाठी लागणारे आधुनिक ज्ञान व कौशल्याचा अभाव त्यांच्यात दिसून येतो. म्हणून आशा विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व समुपदेशनाची अत्यंत आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक काळाशी सुसंगत कौशल्य व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी त्यांना आधुनिक शैक्षणिक संधीची ओळखणे, विषेशत: मीडिया आणि ॲडव्हर्टायझिंग, कायदा आणि मानसीक आरोग्य या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधीची ओळख विद्यार्थी वर्गाला असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर देश- विदेशातील शैक्षणिक संधी, फेलोशिप्स आणि स्कॉलरशिप्सची माहीत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेची ओळख करून देणे, त्यांना त्यांचे ध्येय ठरविण्यास मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्या शिक्षणसंस्थेत कोणते उत्तम शिक्षण मिळते, कोणत्या विद्यापीठातून कोणते विशेष शिक्षण घेतल्यानंतर उत्तम करियर होऊ शकते याबाबतही माहिती विद्यार्थ्यांना असणे काळाची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे व प्रितम प्रकाश कला, वाणिज्य महाविद्यालय भोसरी यांच्या संयुक्तविद्यमाने "करियर मार्गदर्शन व समुपदेशन” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते.
दोन दिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये स्पर्धा परीक्षेचे बदलती गणिते, विद्यार्थ्याचे मानसिक आरोग्य, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील संधी, मिडीया व जाहिरात क्षेत्रातील संधी, करियर निवडीचा मूलमंत्र, ऑनलाइन डिजिटल एज्युकेशन, भाषा संस्कृती आणि प्रकाशन क्षेत्रात संधी, अशा विविध विषयांवर दोन तज्ञ मार्गदर्शकांनीं मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत डॉ. शिवाजी जवळगेकर, डॉ विनोद माने, डॉ. किशोर यादव, प्रा. लक्ष्मण पवार, डॉ प्रकाश यादव, श्रेया सुब्बणवर, संयोगीता मॅडम युवा शक्तीचे पत्रकार श्री. मंगेश वाघमारे, अँड.राणी सोनवणे, प्राचार्या अँड शुभा पिल्ले, श्री. जावेद अत्तार, श्री.नरेश गोटे, श्री.अविनाश काळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सी.ए. प्रा.अशोक पगारीया, उपाध्यक्ष विलास पगारीया, बार्टीचे विभागप्रमुख श्री.नरेश गोटे, प्राचार्य सदाशिव कांबळे, श्री. सुनिल दोरवे, प्रा.लक्ष्मण पवार, प्रा.सचीन पवार, ग्रंथपाल उत्तम साठे,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचीन पवार यांनी केले व आभार प्रा.भास्कर पांडुरंग यांनी मानले.