>

तेरणा शेतकरी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहील : पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत



 तेरणा शेतकरी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहील : पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत


विरोधकाच्या टीकेला डॉ. सावंताचे जोरदार उत्तर

ढोकी (सा.संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) मी सर्वांच्या साक्षीने सांगतो की तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा सभासदाच्याच मालकीचा राहील. कारण तुमच्या केसाला धक्का तो माझ्या जीवाला धक्का असे भावनिक आव्हान देखील पालकमंत्री 

डॉ. तानाजी सावंत यांनी ऊस उत्पादक व सभासद यांना केलेले आहे. विरोधक फक्त अफवा पसरवतात त्याचे ताजे उदाहरण आपण लोकसभेला बघितलेले आहे मात्र त्यात काहीही तथ्य नाही असेही ते म्हणाले.

    २४ सप्टेंबर २०२४ रोजी भैरवनाथ उद्योग वर्क्स संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना तेरणानगर ढोकी येथे प्रथमच ऊस उत्पादक शेतकरी व सभासद स्नेह -संवाद मिळवा आयोजित करण्यात आलेला होता.  व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत, नितीन पाटील, तर शेतकरी मिळाला मुद्दाम उपस्थित असलेले ऊस शेतीचे गाढेअभ्यासक डॉ .संजीव माने उपस्थित होते.

   सविस्तर वृत्त असे की त्यांना तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना बारा वर्षे बंद होता मात्र त्या बारा वर्षे तपानंतर 

डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे आला. त्यानंतर २०२४ रोजी त्यांनी कारखाना सुरू केला. त्यावेळी ऊसाला सर्वाधिक २८२५ रुपये भाव देऊन शेतकऱ्यांचा गौरव केला. व त्यानिमित्ताने कारखाना विकणार आहे असे विरोधकांनी अफवा केली डॉ .तानाजी सावंत यांनी त्यांचा तो समाचार घेतला तो देखील उल्लेखनीय होता. तसेच ते पुढे म्हणाले की, आपल्या जिल्ह्यातील दूध संघ जिल्हा बँक कोणी बुडवली सर्वांना माहिती आहे. प्रत्येक गोष्टीत ते एकमेकांवर टीका करून मोकळे होतात. त्या जोडीला काळूबाळू ची जोडी म्हणून देखील त्यांनी संबोधली आहे. ही काळूबाळू ची जोडी काहीच करत नाही मात्र त्यांना दोन विकासाच्या गोष्टी सांगता येत नाहीत . हे मात्र चुकीचे आहे. २०१९ रोजी मी या दोघांना निवडून आणले मात्र हे दोघे आज माझ्यावरच आरोप करत आहेत. आज आपल्या जिल्ह्यातील लोक पुणे मुंबईला नोकरीला जातात मात्र त्यांच्यासाठी हे येथे उद्योग काढू शकले नाहीत. त्याचप्रमाणे हा साखर कारखाना ३६ हजार सभासदाचा आहे. कुणाच्या बापाचा नाही तो त्यांच्याच मालकीचा राहील असे एकदा त्यांनी पुन्हा सर्व सभासदांना सांगितले. इथल्या नेते मंडळीच्या पोटात पाप नसलं तर हा कारखाना २०२२ रोजी सुरू झाला होता मात्र त्यांनी सतत अडकती आणण्याचा प्रयत्न केला. आपले दोन सीजन वाया गेले ते पाप विरोधक कुठे फेडणार याचा त्यांनी विचार करणे गरजेचे आहे.  रात्री जाऊन लातूरचे  नेत्यांना भेटणे   दिल्लीत जाऊन खलबत्त करणे सतत कोर्टाच्या चक्र मारणे हे करण्यापेक्षा जर कारखाना व्यवस्थित केला असता तर आजही वेळ आली नसती. आज भूम परंडा मतदारसंघात दीड हजार कोटीचा निधी येतो तेथील सर्व रस्ते गुळगुळीत झाले आहेत. आता जर केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करायची म्हटले तर  आपला खासदार नसल्यामुळे काय म्हणून आपण तेथे मागणी करायची हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तेव्हा आपले शासनाने सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी व्यापारी व सर्वांसाठी हे शासन आहे तेव्हा आपले शासनाने एक रुपयात पिक विमा, लाडकी बहीण योजना ,अशा अनेक योजना आणल्या आहेत त्याचा लाभ घेणे अत्यंत आवश्यक आहे असेही ते म्हणाले. तेव्हा विरोधकाने काय केले यावरही त्यांनी कडाडून टीका केली.

        तत्पूर्वी कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी आप्पा कापसे आपले मनोगत व्यक्त केले. म्हणाले की मी आज खऱ्या शिवसेनेत आलेलो आहे. मी दोन वेळा नगराध्यक्ष पंचवीस वर्षे नगरसेवक व आज सभापती आहे. मी  सतत जनतेचा विकास घेऊन काम करत असतो. गेल्या वेळेस मी आमदारकीचा दावेदार होतो मात्र तो मान मतदारसंघाचे बाहेरच्या व्यक्तीला मिळाला असेही ते म्हणाले.

   तत्पूर्वी उत्पादकाचे गाढे अभ्यासक डॉ. संजीव माने यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले ते म्हणले एका एकराला आपण जर पाटाने पाणी दिले तर एक लाख कोटी लिटर पाणी लागते ,व जर ठिबक सिंचन दिले तर चाळीस लाख लिटर पाण्यात होते तेव्हा आपण जास्तीत जास्त ठिबक सिंचनाचा वापर करावा असेही ते म्हणाले.

   स्नेहसंवाद मेळाव्याचे आभार

ॲड धनंजय धाबेकर यांनी मानले तर राष्ट्रगीत आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post