>

सभासद व ऊस उत्पादक शेतकरी स्नेह -संवाद मेळाव्याची जोरदार तयारी सुरू


 

सभासद व ऊस उत्पादक शेतकरी स्नेह -संवाद मेळाव्याची जोरदार तयारी...

तेरणा कारखान्यावर प्रथमच होतोय शेतकरी स्नेह -संवाद मेळावा

ढोकी (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) 

सभासद ऊस उत्पादक शेतकरी स्नेह -संवाद मेळाव्याची जोरदार तयारी होत आहे. या संवाद मेळाव्याला लातूर , कळंब, धाराशिव तीन तालुक्यातील सर्व सभासद उपस्थित राहणार असून हा भूतो न भविष्य असा हा प्रथमच स्नेहसंवाद मेळावा होत आहे. या कारखान्याला तीन तालुक्यातील जवळपास १७० गावे असलेला हा कारखाना आहे.

    सविस्तर असे की, भैरवनाथ उद्योग समूह संचलित, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड तेरणा नगर ढोकी  तालुका जिल्हा धाराशिव या कारखान्यामार्फत तेरणा परिवार सभासद व ऊस उत्पादक शेतकरी स्नेह -संवाद मेळावा २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता  तेरणा नगर  ढोकी येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

    या संवाद मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून  नामदार

  डॉ.तानाजीराव सावंत साहेब आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजीराव सावंत साहेब चेअरमन भैरवनाथ उद्योग समूह, त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती म्हणून श्री धनंजय सावंत साहेब व ऊस विकास मार्गदर्शक. 

 डॉ. संजीव माने यांचे सुद्धा सर्व ऊस उत्पादक व सभासद यांना मार्गदर्शन होणार आहे. 


  तेव्हा  स्नेह -संवाद मेळाव्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यकारी संचालक विक्रम सावंत व  तेरणा बचाव संघर्ष समिती यांनी केलेले आहे.

आपण जर विचार केला तर प्रथमच तेरणा सभासदाच्या अडचणी सोडवण्यासाठी व संवाद साधण्यासाठी हा शेतकरी स्नेह -संवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना यांनी २०२३-२४ या हंगामात सर्वाधिक ऊसाला भाव देऊन खऱ्या खऱ्या अर्थाने एक पॅटर्न निर्माण केलेला आहे. २८२५ रु  हा ऊसाला प्रति टन भाव देऊन त्यांनी हे सिद्ध केले की शेतकऱ्यांचे खरेखुरे तारणहार  तेरणा शेतकरी साखर कारखानाचा आहे. तो म्हणजे पालकमंत्री डॉ

 तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनात होय. एक दूरदृष्टी नेतृत्व होय. सावंत सरांची गोष्ट वेगळी आहे त्यांच्याकडे आज आरोग्य सारखे महत्त्वपूर्ण खाते आहे त्या खात्याला सुद्धा न्याय देण्याचे काम त्यांनी केलेले आहे. त्याचप्रमाणे आपण विचार केला तर नुकताच त्यांनी जो आरोग्य मेळावा घेतला होता त्याची दखल जागतिक स्तरावर सिद्ध झालेली होती. आतापर्यंत एवढे आरोग्यमंत्री झाले मात्र असे कार्य कुणीच केलेले नाही अशी त्यांची ओळख आहे. हाच पॅटर्न तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे राबवित आहेत हे मात्र नक्की आहे . त्यात विरोधकांचे धाबे सुद्धा दणाणले  आहेत.

        त्यांचा जो विरोधकरांनी अपप्रचार केला त्याचा समाचार ते घेणार आहेत. अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांचा हा स्नेह -संवाद मेळावा हा यशस्वी होणार व शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार त्याची जय्यत तयारी तेरणा नगर ढोकी येथे सुरू आहे .सर्व जिल्ह्यात त्याची चर्चा असल्याचे सुद्धा चित्र दिसत आहे. कारण असा हा मेळावा याच्या आधी कधी झाला नाही . असा हा स्नेह मेळावा होणार आहे. या मेळाव्याला सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सर्वांची बैठक व्यवस्था अत्यंत चांगल्या रीतीने करण्यात आलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post