आरक्षण संपविण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसला कायमचे दूर ठेवा :मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
सुधीरअण्णा पाटील यांनी केलेल्या कार्याची मुख्यमंत्र्याकडून प्रशंसा
#शिवसैनिकांचा जल्लोष, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा #मेळावा संपन्न....!
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) आरक्षण संपविणाऱ्या काँग्रेसला कायमचे दूर ठेवा कारण संविधानांचा काँग्रेसने अपमान केला आहे. याला जनता कधी माफ करणार नाही.
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सुधीर अण्णा पाटील आयोजित हातलाई मंगल कार्यालय & लॉन्स येथे शिवसेनेचा भव्य मेळावा पार पडला.
सुरुवातीला, प्रेमलताई पाटील यांच्यासह महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण केले, तर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना राखी बांधून लाडकी बहीण योजनेबद्दल आभार मानले. महिला भगिनींचा उत्साह आणि संख्या पाहून मुख्यमंत्री शिंदे साहेबांनीही लाडकी बहीण योजनेच्या प्रतिसादावर आनंद व समाधान व्यक्त केले.
यावेळी, धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या 190 शाखांच्या पाट्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पूजन करण्यात आले.
"सुधीर अण्णांच्या नेतृत्वात होत असलेल्या 190 शिवसेना शाखांचे पूजन म्हणजे हे खऱ्या हाडाच्या आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसैनिकाचं काम आहे" अशा शब्दात शिंदे साहेबांनी भाषण करतेवेळी सुधीर अण्णा पाटील यांना कौतुकाची थाप दिली
विशेष म्हणजे या मेळाव्यात 17 सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्रामच्या लढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे, न भूतो न भविष्यती असा हा सोहळा संपन्न झाला.
संविधानाचा अपमान करत पर्यायाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या काँगेसला कायमचे दूर सारून राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आणण्याचा संकल्प यावेळी शिंदे साहेबांकडून करण्यात आला. त्यास, धाराशिव जिल्हा शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी दाद दिली.
राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा घेतला असल्याचे नमूद केले. महाविकास आघाडीच्या कालखंडात अडीच वर्षे सारे ठप्प होऊन गेले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण राज्यात सत्तांतर घडवून आणले आणि त्यानंतर आपली दोन वर्षे एकीकडे आणि आधीची अडीच वर्षे एकीकडे अशी परिस्थिती असल्याचे सांगितले.
गेल्या दोन वर्षात ६०० निर्णय घेतले असून त्यातील एकही निर्णय स्वतःसाठी घेतलेला नाही, असे याप्रसंगी मुखमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
दरम्यान, शिवसेना मेळाव्यामुळे शिवसैनिकांत
ऊर्जा निर्माण झाली असून विरोधकाना धडकी भरली आहे. या मेळाव्यामध्ये धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघांमधील खूप मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश देखील करण्यात आले
याप्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील आमदार, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.