नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध-डॉ.प्रतापसिंह पाटील
पारा येथे डोळे तपासणी व फिजिओथेरपी शिबीर संपन्न
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
-आपल्या भागातील नागरिक हे अनेक आजार अंगावर काढतात त्यामुळे या आजारावर योग्य वेळी जर उपचार झाले तर तो मोठ्या आजारापासून तो दूर राहतो मात्र योग्य वेळी उपचार न झाल्यामुळे तो आजार मोठा होत जातो त्यामुळे आम्ही नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे या हेतूने आरोग्य शिबिरांचे आयोजन करत आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी पारा येथील आरोग्य शिबिर उद्घाटन प्रसंगी केले.
पारा ता.वाशी येथे डोळे तपासणी, चष्मे वाटप,औषध वाटप व फिजिओथेरपी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास ५०० गरजू रुग्णांनी याचा लाभ घेतला. या आरोग्य शिबिरास मनिष भराटे,शैलेश पाटील,अतुल पाटील,उमेश चौधरी,धनंजय जामदार,अंकुश फूरडे,शशिकांत टाचतोडे,राजेश शिंदे,सुरेश ढेंगले,सूरज शिंदे,कृष्णा शिनगारे,विकास शिनगारे यांच्यासह पारा गाव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की,आरोग्य शिबिरामुळे छोट्या छोट्या व्याधीवर देखील योग्य वेळी उपचार होतात. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रीद वाक्य घेऊनच मी आतापर्यंत काम करत आलेलो आहे व यापुढे देखील करत राहील.
हे शिबिर यशस्वी करण्याकरिता डॉ.पूजा आचार्य,डॉ.कैलास अडसुळे,डॉ.गणेश गोरे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरी घाडगे यांनी केले तर आभार राजेंद्र टाचतोडे यांनी मानले.