*केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून धाराशिव जिल्ह्यातील अटल भूजल योजनेअंतर्गत विविध कामांची पाहणी....*
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
जलशक्ती मंत्रालय भारत सरकार, कॅच द रेन अंतर्गत श्री. अशोक कुमार सेंट्रल नोडल ऑफिसर, श्रीम. सायली टेंबूर्णे भूवैज्ञानिक, CGWB, यांच्याकडून खामसवाडी ता. जि. धाराशिव येथील विविध संलग्न विभागांची भूजल पुनर्भरण व जलसंधारणाच्या उपाययोजना तसेच कृषी मधील फळबाग लागवड यांची पाहणी करण्यात आली.
*भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा धाराशिव*
जागतिक बँक व केंद्र शासनाच्या अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल माहिती प्रसारण केंद्राचे उद्घाटन श्री. अशोक कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ मेघा शिंदे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी भूजल विषयी माहिती दिली तर भूजल मित्रांनी माहिती प्रसारण केंद्रातील पाण्याच्या ताळेबंद, भूजल पातळी नोंदी, पर्जन्यमानाच्या नोंदी, फळबाग लागवड, पाणी बचतीच्या उपयोजना, जलसंधारणाच्या उपाययोजना, योजनेचे उद्देश, निरीक्षण विहीर, वॉटर लेवल इंडिकेटर, यशोगाथा इत्यादी बाबतची माहिती देण्यात आली. व क्षेत्रीय भेटी दरम्यान भूजल पुनर्भरण रिचार्ज शाफ्टची पाहणी करण्यात आली.
*जिल्हा मृद व जलसंधारण विभाग*
श्री पी.के. महामुनी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी नाला खोलीकरण व जलसंधारणाच्या उपयोजनांची माहिती दिली. तर आर. यू पिंपळे उपविभागीय जलसंधारण अधिकारी उपविभाग ल. पा.जिल्हा परिषद धाराशिव यांनी कोल्हापुरी बंधारे, सिमेंट नाला बांध झालेल्या जलसंधारण कामाची माहिती दिली.
*कृषी विभाग*
श्री रविंद्र माने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी फळबाग लागवड, पिकांची रचना, मार्केटिंग, गटशेती इत्यादी बाबतच्या कामांची माहिती सांगण्यात आली.
श्री सरवदे सर कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि पाणी व स्वच्छता विभाग यांच्याकडून जलजीवन मिशन अंतर्गत केलेली कामे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षाकडून ॲड.ब्रम्हदेव माने जिल्हा माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ यांनी सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्री हिंदुराव काबुगडे कृषी तज्ञ व श्री वैभव राज गायकवाड जलसंधारण तज्ञ श्री डी सी राठोड समन्वयक डीआयपी, रामकृष्ण पवार राहुल अवधूते यांनी कार्यक्रमाची तयारी केली.
ग्रामपंचायत कार्यालयाकडून ग्रामसेवक आर व्ही शिंदे,सरपंच महादेवी भोसले, उपसरपंच श्रीकांत भोसले,संतोष गुळवे, यशवंत पाटील, खंडू गुळवे, पोपट भोसले, विनोद पाटील,मारुती भोसले, पांडुरंग शिरसागर, प्रशांत माने, अंजुमारा शेख पोलीस पाटील,सौ. मोहिनी क्षीरसागर,सौ सविता भोसले, सौ सीता गुळवे,सौ यशोदा गायकवाड, इ. उपस्थित इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते तर
यावेळी जलशक्ती मंत्रालयाकडून रिचार्ज शाफ्टच्या कामाचे कौतुक करण्यात आले त्यामुळे भूजलाच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने समाधान व्यक्त केले.