>

केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार : डॉ. प्रतापसिंह पाटील


 केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार-डॉ. प्रतापसिंह पाटील 


 धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

भाजप सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा झालेल्या आहेत मात्र या किती पूर्ण होतील हे वर्ष पूर्ण झाल्यानंतरच कळेल. केंद्राने मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार असल्याची तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी दिली आहे.

शेतीसाठी १.६२ लाख कोटीच बजेट जाहीर करण्यात आलं आहे. मात्र हे बजेट शेतीच्या कोणत्या कामासाठी आहे या बाबत शेतकरी संभ्रमात आहे. दरम्यान इतर महागड्या वस्तूमधील कर कमी करण्यात आला आहे.मात्र शेतीच्या साहित्यामधील कर कमी करण्यात आला नाही.शेतकऱ्याची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केला आहे 

हे एका विशिष्ट राज्याचं बजेट नसून देशाचं आहे. त्यामुळे सर्व राज्याला समान अधिकार मिळेल अशी आमची अपेक्षा होती. बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना झुकत माप दिल आहे कारण हे सरकार तेथील नेत्यांवर अवलंबून आहे. महाराष्ट्रात भाजप विरोधी दिलेला कौल हा भाजप नेत्यांना रुचला आहे असं वाटत नाही. म्हणूनच या अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला अशी महाराष्ट्रवासियांची भावना आहे. त्यासोबतच दहा लाखापर्यंत त्याचे उत्पन्न हे टॅक्स फ्री होईल अशी सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा देखील या सरकारने पूर्ण केलेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प हा लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post