लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी प्रयत्न करणारे योगेश केदार पहिले नेते
*शिवरायांची किर्ती सातासमुद्रापार पोचवणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा - शिवसेना प्रवक्ते योगेश केदार.
राज्य शासनाने केंद्र सरकार कडे प्रस्ताव पाठवावा अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिले.*
*त्यावर तत्काळ प्रस्ताव सादर करण्या च्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केल्या....*
पत्रात लिहिलेला मसुदा पुढीलप्रमाणे.
माननीय एकनाथ शिंदे साहेब
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
विषय:- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळणेसाठी राज्य शासनाच्या वतीने केंद्राकडे शिफारस करणे बाबत.
महोदय,
आपण संपूर्ण राज्यातील सर्व जाती जमाती समाजांना आपल्या कार्यकाळात न्याय देत आहात. हे आता सर्वश्रुत झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे साता समुद्रापार पोचवणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात तसेच सामाजिक चळवळींमध्ये प्रचंड मोठे योगदान आहे. त्या महापुरुषाच्या त्यागमुळेच आज मुंबई संयुक्त महाराष्ट्रात आली. हेही आपणास माहिती आहे. एकंदरीत भारताची मान जगात उंचवण्या मध्ये अण्णाभाऊंनी आपल्या हयातीत काहीच कसूर सोडली नव्हती.
ज्यांनी देशाला दिशा दिली असे महाराष्ट्रात अनेक नररत्न जन्मले त्यापैकीच एक असणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. त्यानिमित्ताने आपल्याला सर्व समाजाच्या वतीने विनंती करतो की आपण वरील विषयी योग्य तो निर्णय घ्याल.
येत्या 1 ऑगस्ट ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. तोपर्यंत शासनाने योग्य तो निर्णय घेतल्यास महाराष्ट्रात योग्य तो सकारात्मक संदेश जाईल. विशेषतः मातंग समाज बांधवांची अस्मिता अधिक उत्तुंग होईल.
पुनश्च एकदा आपणास धन्यवाद
आपला
योगेश केदार
प्रवक्ता शिवसेना
9823620666