>

भाई उद्धवराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे अभिवादन


 भाई उद्धवराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉ.प्रतापसिंह पाटील यांचे अभिवादन

धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

धाराशिव जिल्ह्याचे भूमिपुत्र,जिल्ह्याचा नावलौकिक राज्यभर करणारे ,राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलेले,मा.खा. स्वर्गीय भाई उद्धवराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज  छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी भाई उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल निंबाळकर, काँग्रेस पक्षाचे धाराशिव शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस धाराशिव तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे युवकचे आदित्य पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे विधी विभागाचे शहराध्यक्ष ॲड.योगेश सोन्ने-पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते धीरज घुटे यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post