>

जनतेने नाकारल्यामुळेच घोषणांचा पाऊस : डॉ. प्रतापसिंह पाटील


 


जनतेने नाकारल्यामुळेच अधिवेशनात घोषणांचा पाऊस:

डॉ प्रतापसिंह पाटील 

विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडल्यामुळे शरद पवार गट आक्रमक

धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)- लोकसभेत महायुतीला बसलेला जबर झटका व  लोकांनी नाकारल्यामुळे या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. अनेक चांगल्या व लोभस योजना या अर्थसंकल्पात घोषित केल्या आहेत हा अर्थसंकल्प म्हणजे विधानसभेचे घोषणापत्र आहे की काय ?असं वाटावं इतक्या योजना यामध्ये सांगितल्या आहेत  पण अगोदरच राज्य  सरकारवर सात लाख कोटीच्या कर्जाचा बोजा आहे. त्याची परतफेड कशी करणार व नवीन योजनांना निधी कुठून आणणार याचे उत्तर या अर्थसंकल्पात मिळत नाही अशी सडेतोड प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आहे.

मुलींना मोफत शिक्षण ही योजना चांगली असली तरी आता शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास 15 ते 20 दिवस झाले आहेत व याची अंमलबजावणी प्रशासनाने लवकर केली तरच उपयोग आहे अन्यथा ही योजना फारशी उपयुक्त ठरणार नाही तर महिलांना दरमहा 1500 रुपये ही घोषणा म्हणजे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेवटचा अर्थसंकल्प सादर करताना सरकारला सुचलेलं शहाणपण आहे असेच म्हणावं लागेल.गॅसच्या तीन टाक्या मोफत देण्याऐवजी गॅसचे टाक्याचे दर निम्म्यावर आणले असते तर सर्वसामान्य माणसाला यामध्ये दिलासा मिळाला असता एकूणच हा अर्थसंकल्प म्हणजे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प दिसतो.

Post a Comment

Previous Post Next Post