आपल्या गावाला पाणी मिळू नये म्हणून प्रयत्न करणारे झारीतील शुक्राचार्य कोन: नितीनजी काळे
मस्सा गावची सभा गाजवली
कळंब (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
मस्सा या गावाला पाणी मिळू नये म्हणून व जलजीवन विषयीचे काम पूर्ण होऊ न देण्यासाठी प्रयत्न करणारे झारीतील शुक्राचार्य कोण हे आपल्याला माहित आहेत. तेव्हा जल जीवन चे काम व्यवस्थित आहे परंतु विरोधकांना वाटते कोरड्या विहिरीतील पाणी उपसणे होय.
अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांनी केले.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत चांगल्या प्रकारे चुरस निर्माण झाली असल्यामुळे प्रचार हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आहे. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी चे नितीनजी काळे यांनी मसा या गावची सभा गाजवली. विरोधकांवर आरोप करताना ते म्हणाले, ही निवडणूक ग्रामपंचायतची नसून जिल्हा परिषदेचे नसून मार्केट कमिटीचे नसून ही निवडणूक आहे देशाच्या अस्मितेची होय. महाविकास आघाडीला मतदान म्हणजे राहुल गांधीला मतदान तर अर्चनाताई यांना मतदान म्हणजे नरेंद्र मोदी यांना मतदान करणे होय. तेव्हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांना विजयी करा. केंद्र सरकारचे हात बळकट करा. असे प्रतिपादन त्यांनी केले.
देशात आज केंद्र सरकार चांगल्या रीतीने काम करत आहे. मात्र विरोधकांना टीका करण्यापलीकडे काहीच माहित नाही. देश आज प्रगतीपथावर असताना केवळ नरेंद्र मोदी ला विरोध म्हणून इंडिया आघाडी करत आहे. मात्र त्याचा काही उपयोग नाही. तसेच ते पुढे म्हणाले तुमच्या गावाला ही योजना येणार होती ती योजना कोणी अडवली हा संवाद तुम्ही त्यांना केला पाहिजे. कारण आपला लोकप्रतिनिधी हा सर्वांचे काम करणे लागतो. मात्र ते फक्त आमच्यावर टीका करण्यात व्यस्त आहेत. मात्र जनता ही महायुतीच्या बरोबर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो अर्चना ताईंना मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत होय. तेव्हा घड्याळ समोरील बटन दाबून महायुतीला विजयी करा. त्याचप्रमाणे विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका व नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी खासदार म्हणून आपण आपला मतदान हक्क बजावताना विकास कोण करणार आहे हे पाहून मतदान करा. व घड्याळाला मतदान करून अब की बार ४०० पार पूर्ण करून दाखवा असेही ते म्हणाले.
तेथील व्यासपीठावर सरपंच, तसेच एस.पी. शुगर्स चे चेअरमन सुरेश बापू पाटील, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच महायुतीच्या सभेला सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.