>

ओमराजे निंबाळकर गेल्या वेळेस पेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येणार :डॉ. प्रतापसिंह पाटील


 ओमराजे निंबाळकर हे पुन्हा गेल्या वेळेस पेक्षा  मोठ्या मताधिक्याने लोकसभेत जाणार-डॉ.प्रतापसिंह पाटील 

केंद्र सरकारचा घेतला खरपूस समाचार

धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

उस्मानाबाद लोकसभेमधून पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर हे खासदार होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे त्यामुळे मतदारांनी त्यांना भरघोस असे मतदान करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी लोणी येथील प्रचार सभेत बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर  महविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील,माजी आमदार राहुल मोटे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील, परंडा शिवसेना तालुकाप्रमुख मेघराज पाटील, काँग्रेसचे तालुकाप्रमुख वाघमोडे,रणजित मोटे यांच्यासह अनेक महविकास  पदाधिकारी उपस्थित होते. 

पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सर्व सहकारी चारशे पार जाणार अशा घोषणा देत असले तरी देखील ते आतून घाबरलेले आहेत आणि देशात पुन्हा इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे.त्यामुळे आपला खासदार हा देखील त्याच विचाराचा असावा म्हणून ओमराजे निंबाळकर यांना भरघोस मतांनी आपण विजयी केलं तर निश्चितपणाने आपला खासदार हा सत्ताधारी होणार आहे. आज विविध सर्वे देखील इंडिया आघाडीच्या बाजूने येत आहेत तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 पेक्षा जास्त जागेवर विजयी होईल असे देखील यावेळी डॉ.पाटील यांनी सांगितले. या प्रचार सभेस लोणी  व परिसरातील अनेक मतदार बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post