>

अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा व खंडित वीजपुरवठा पूर्ववत करा :डॉ. प्रतापसिंह पाटील


 अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून वीजपुरवठा सुरळीत करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)-

अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची पंचनामे करून वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील आठही  तालुक्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह , पावसाने मोठे नुकसान झाले आहे.यामध्ये अनेक शेतकरी बांधवांच्या फळबागा व पिके उध्वस्त झाली आहेत तसेच अनेकांच्या घरांची पडझड होऊन नुकसान झालेले आहे. वादळ वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात  संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना आदेशित करून पंचनामे करण्यास सांगावे.तसेच अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात वीजपुरवठा  बंद झालेला आहे. त्या ठिकाणी वीजपुरवठा तात्काळ सुरळीत व्हावा व संबंधित खात्याला निर्देश द्यावेत व लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post