>

ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी मकरंदभैय्या राजेनिंबाळकर सरसावले



 ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी मकरंद भैया राजे निंबाळकर सरसावले

विरोधकासाठी धडकी भरवणारा महाविकास आघाडीचा प्रचार

डोअर टू डोअर प्रचार सुरू

धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

#धाराशिव (उस्मानाबाद)-40 लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज दि २१/०४/२०२४ रोजी प्रभाग क्रमांक ०२ (दोन) मधील हनुमान मंदिर येथे नारळ फोडून डोअर टू डोअर प्रचारास सुरुवात करण्यात आली..

 सदर प्रचाराची सुरुवात दि. १८/०४/२०२४ रोजी पासून करून धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक. ०१ (एक), प्रभाग क्रमांक ०५ (पाच) आणि प्रभाग क्रमांक ०२ (दोन) मधील महात्मा गांधी नगर पर्यंत डोअर टू डोअर प्रचार महाविकास आघाडी व घटक पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्ण करण्यात आला ..

महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश  राजेनिंबाळकर हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार आहेत,सर्वसामान्य जनतेच्या हाकेला उभे राहणाऱ्या या उमेदवाराला पुन्हा दिल्लीला पाठवण्यासाठी मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी माझ्या समवेत धाराशिव काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, ऍड शशिकांत निंबाळकर, मसुद भाई शेख, सोमनाथ गुरव, अग्निवेश शिंदे, आयाज बबलू शेख, रोहित बागल, उमेश राजेनिंबाळकर, रोहित निंबाळकर, बापु साळुंखे,राणा बनसोडे, शेखर घोडके,  नितीन शेरखाने, बाळासाहेब काकडे, संग्राम बागल, नाना घाडगे, बाबू पडवळ, निलेश शिंदे, सतीश लोंढे, गणेश राजेनिंबाळकर, रणवीर इंगळे, मनोज पडवळ, सह्याद्री राजेनिंबाळकर, बंडू आदरकर, पंकज पाटील, सुमित बागल, धनंजय राऊत, सौरभ गायकवाड, मनोज शेरकर, महादेव मगर, अजिंक्य राजेनिंबाळकर, संदीप शिंदे, मंगेश भुजबळ अक्षय जोगदंड, आजित बाकले, दत्ता सोकांडे , संकेत पडवळ, पृथ्वीराज देडे, पुजाताई देडे, स्वप्निल शिंगाडे, आदींसह सर्व महाविकास आघाडी घटक पक्षाचे सहकारी,कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते..


Post a Comment

Previous Post Next Post