सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला डॉक्टर केलेले दाखवा ओमराजेंचा तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून विरोधकावर हल्लाबोल...
ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या खास शैलीत विरोधकावर
हल्लाबोल
तामलवाडी ची सभा ओमराजे यांनी गाजवली जिल्ह्यात चर्चा
तुळजापूर (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला डॉक्टर केलेले दाखवा अशी चौफेर टीका महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकावर केली. तेरणा ट्रस्टच्या दवाखान्यात १८ कोटी रुपये शासनाकडून लाटले असेही टीका ओमराजे निंबाळकर यांनी केली.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे प्रचार सभेत ते बोलत होते. त्यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण ,माजी मंत्री आमदार अमित भैया देशमुख आदी मान्यवर नेते उपस्थित होते.
विरोधकावर टीका करताना ओमराजे यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की शासनाचे मेडिकल कॉलेज मंजूर झालेले नेरूळ आणि घेऊन गेले. व ते मेडिकल कॉलेज स्वतःच्या नावाचे करून घेतले. व निशुल्क पेशंट तपासणी ही केवळ फेक आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून त्यांनी शासनाकडून पैसा उकळले व इकडे जनतेची फसवणूक करत आहेत असेही ते म्हणाले. तेरणा ट्रस्टच्या २०१३ मध्ये १६ व्यक्तीवर १३८ शस्त्रक्रिया, २०१४ रोजी नऊ पेशंट वर ८० प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या असे सांगण्यात आले. २०१२ पासून ते २०२३ पर्यंत त्याचा लेखाजोखा केला तर अठरा कोटी रुपये शासनाकडून घेतले. ज्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया झाल्या त्या समोर आणाव्या असे आवाहन ओमराजे निंबाळकर यांनी केले.
तुमची प्रत्येक गोष्ट पुराव्यास निशी उघड करणार व जनतेसमोर तुमचे सत्य आणल्याशिवाय राहणार नाही. असे टिकास्त्र विरोधकावर ओमराजे यांनी सोडले सोडले.
मी १३०३ कोटीचा निधी केंद्र सरकारकडून आणला. तसेच त्यांनी जिल्ह्यातील कुठल्या कुठल्या ठिकाणी रोहित्र दिले त्या गावची यादी वाचून दाखवली. तसेच वैयक्तिक रोवित्र देखील शेतकऱ्यांना देण्याचे काम त्यांनी केले असेही ते म्हणाले.
तसेच नरेंद्र मोदी सरकार टीका करताना ते पुढे म्हणाले की, २०२२ पर्यंत शेतीचे उत्पन्न दुप्पट म्हणणारे खताचे, नांगरणाचे भाव तिप्पट केले मात्र शेतीचे उत्पन्न दुप्पट झाले नाही अशी घनघोर टीका ओमराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारवर केली.
११००० वर गेलेले सोयाबीन आयात करून ते चार हजारावर भाव आणले. प्रति एकर चा जर हिशोब लावला तर प्रति एकरी तीस हजार रुपये चे नुकसान केंद्रातील मोदी शहा सरकारने केले असेही ते म्हणाले.
त्याचप्रमाणे कांद्या विषयी बोलताना ते (म्हणाले की ज्या गावात कांद्याचे उत्पादन आहे ते शेतकरी हातात कांदा घेऊनच बसले आहेत. ज्या शेतकऱ्याचे कांद्याचे नुकसान झाले आहे .तेव्हा विरोधकांना कांदा रडविल्याशिवाय राहणार नाही.
२०२० पर्यंत पीक कर्जाची परिस्थिती फक्त १९ टक्के होती. ज्यावेळेस मी शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा विषय हाताळला त्यावेळी पीक कर्जाचे टार्गेट तेराशे कोटी होते तेव्हा मी शेतकऱ्यांना एक हजार कोटीपर्यंत कर्ज मिळवून दिले. तेव्हा विरोधकासमोर हे सांगणे गरजेचे आहे मी काम केले मात्र त्याचे श्रेय घेतले नाही व कुठेही त्या श्रेयाचे नारळ फोडले नाही असेही ओमराजे निंबाळकर म्हणाले.