>

तुळजापूरच्या विकासासाठी विद्यमान खासदारांनी काय पाठपुरावा केला जनतेला उत्तर द्यावे :आ. राणाजगजीतसिंह पाटील


 तुळजापूरच्या विकासासाठी विद्यमान खासदारांनी काय पाठपुरावा केला आहे जनतेला उत्तर द्यावे : 

आ. राणाजगजितसिंह पाटील 

तुळजापूर (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) तुळजापूरच्या विकासासाठी विद्यमान खासदारांनी काय  पाठपुरावा केला आहे याचे उत्तर जनतेला द्यावे.

नौटंकी आणि खोटारडेपणा करणारा खासदार आपल्याला नको आहे. तर आपल्याला असा खासदार पाहिजे जो मोदी सरकारच्या पाठीशी उभे राहील; जो ताकदीने धाराशिवसाठी निधी उपलब्ध करून देईल, जो मोठमोठ्या योजना आपल्या भागामध्ये घेऊन येईल. केंद्रातील विचारांचा खासदार आपल्या भागातून गेल्यास तो भरघोस निधी धाराशिवसाठी घेवून येईल. त्यासाठी अर्चना पाटील यांना मतदान करा, असे आवाहन भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले. त्यांनी यावेळी विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली. 

धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या आमदार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 

पाटील म्हणाले, आई तुळजाभवानीच्या मंदिर विकासासाठी आपल्याला केंद्र सरकारचा निधी आवश्यक होता. आपल्या तुळजापूरच्या विकासासाठी हक्काचे पैसे केंद्र सरकार कडून मिळत असताना देखील, विद्यमान खासदारांनी काय पाठपुरावा केला? एक ओळीचा प्रस्ताव देखील या खासदारांनी केंद्राकडे पाठवलेला नाही. पिक विम्याच्या बाबतीत आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो केंद्र सत्ता सरकारच्या अख्यारित्या विषय होता त्याबाबतीत या खासदारांनी काय केलं? हे प्रश्न मूलभूत आहेत.

पुढे बोलताना पाटील म्हणाले,  राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे. केंद्रात देखील मोदींचे सरकार येणार आहे त्यामुळे आपल्या भागात विकास घडवून आणण्यासाठी महायुतीच्या विचाराचा खासदार आपल्या भागातून निवडून जाणे गरजेचे आहे. मोदीजी नेहमी म्हणतात "सबका साथ सबका विकास, सबका विश्वास सबका प्रयास'. सर्व जाती धर्माच्या सर्व वर्गातील जनतेला बरोबर घेऊन नरेंद्र मोदी यांनी जी विकासाची घोडदौड सुरू केली आहे. त्या संपूर्ण प्रक्रियेत तुमचे देखील योगदान गरजेचे आहे. त्यासाठी तुमचा देखील हातभार गरजेचा आहे. त्यामुळे येणाऱ्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदार आपली सत्सत विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदानाचा योग्य निर्णय घेईल, असा विश्वास देखील राणाजगजतसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post