>

देशात पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान : नितीन काळे :

 


देशात पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान : नितीन काळे

कोलेगाव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) देशात पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत .त्यामुळे आपण सर्वांनी मिळून अर्चनाताई पाटील यांना लोकसभेत पाठविणे अत्यंत गरजेचे आहे. कारण देशात व राज्यात महायुतीची सत्ता आहे त्यामुळे आपला विकास आपला खासदारच करू शकतो त्यासाठी आपल्या जिल्ह्यातून हक्काचा खासदार लोकसभेत जायला हवा म्हणून मोदींचे हात बळकट करण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचा खासदार महायुतीचा असला पाहिजे. असे प्रतिपादन कोलेगाव येथील बैठकीत भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले.

   सविस्तर वृत्त असे की भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे देशात महायुती मजबूत व्हावी त्याच अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात सुद्धा महायुती चा प्रचार गावोगावी झाला पाहिजे. त्याच अनुषंगाने प्रत्येक गावात नरेंद्र मोदी यांचे कार्य पोहचले पाहिजे. याच अनुषंगाने लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रचारात कोलेगाव येथील बैठकीत ते संबोधित करत होते.

     तसेच ते पुढे म्हणाले की आपले राम मंदिरांचे स्वप्न पूर्ण झाले. तसेच आरक्षणाचा सुद्धा प्रश्न मार्गी लागलेला आहे. किंवा आम्ही सुद्धा मान्य करतो की एकाच वेळी सर्व गोष्टी होत नाहीत. टप्प्याटप्प्याने त्या पूर्ण होत असतात. त्याचप्रमाणे लातूर टेंभुर्णी रस्त्याविषयीचे बोलताना म्हणाले की त्याचा सुद्धा लवकरच प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याचे तिन विभाग आहेत.  आपण २०१७- १८ रोजी राष्ट्रीय महामार्ग करून घेतला होता. त्यानंतर असे बरेच काही आपले प्रकल्प होते मध्यंतरी महाविकास आघाडीने अडवले होते. व त्यानंतर आपण ते सुरू केले आहेत.

   पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये व राज्य सरकारची सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये शेतकरी सन्मान योजनेद्वारे मिळत आहे. तसेच एक रुपयात पिक विमा अशा अनेक विकासाचे कार्य प्रशासनाने केलेले आहे. तसेच उद्धवजी ठाकरे हे म्हणाले होते की प्रति हेक्टर २५००० मदत द्या. मात्र ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ते देऊ शकले नाहीत हे फार मोठे दुर्दैव आहे.

    तेव्हा महाविकास आघाडीच्या कुठल्याच भूल थापेला बळी न पडता महायुतीला विजयी करा असेही ते म्हणाले. यावेळी कोलेगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post