>

ओमराजे निंबाळकर यांची प्रचारात आघाडी !









ओमराजे निंबाळकर यांची प्रचारात आघाडी !

ओमराजे यांचा जनसंपर्क हीच त्यांची ताकद..

धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

ओमराजे निंबाळकर  विश्वासावर व विकासावर निवडून येणार अशी जनतेत चर्चा होत आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेते म्हणून आपण त्यांचा वारंवार उल्लेख करत असतो. त्याच अनुषंगाने जनतेचा विकास हाच आपला विश्वास  ही त्यांची ताकद आहे.

     ओमराजे निंबाळकर हे प्रथम तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना  त्यांनी चालवला. तसेच २००९ च्या विधानसभा निवडणुकी  ते प्रथम आमदार झाले. व आमदार निधी मतदार संघातील प्रत्येक गावोगावी पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या मतदारसंघातील गाव छोटे असो अथवा मोठे असो तर प्रत्येक गावात निधी देण्याचे काम देखील ओमराजे निंबाळकर यांनी केले. त्याचप्रमाणे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र ते विसरून  नंतर ते लगेच जनतेच्या कार्यात सक्रिय झाले व त्यांनी सलग पाच वर्ष जनतेची सेवा केली. एखाद्या कार्यकर्त्याचा अथवा कुणाचाही फोन ते घेत असत व त्या कामाचा निपटारा देतील ते ताबडतोब करत असत. त्याच अनुषंगाने जनतेचा आमदार म्हणून ते २०१९ पर्यंत चर्चेत होते. मात्र पक्षाशी एकनिष्ठ म्हणून त्यांना धाराशिव मतदार संघाची लोकसभेचे उमेदवार देण्यात आली. व तब्बल १ लाख २८ हजार मतांनी त्यांचा विजय झाला. त्यानंतर त्याचा आज तागायत ते सतत जनतेच्या सेवेत उभे आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी केलेले कार्य सर्वांना ज्ञात आहे.  कारण शिवसेनेत फार मोठी फूट झाली त्यात १३ खासदार वेगळे झाले मात्र ओमराजे यांनी उद्धवजी ठाकरे यांची साथ सोडली नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेत मशाल चिन्हावर धाराशिव ची लोकसभा लढत आहेत. त्या मागचे कारण पक्ष निष्ठा म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली त्यांची उमेदवारी स्वतः पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी गेल्या महिन्यात दौऱ्यावर आलेल्या धाराशिव दौऱ्यात जाहीर केली. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी भक्कम राहील अशी तरी चर्चा असली तरी त्यांना कसरत करावी लागेल हे मात्र नक्की होय. राजकीय जीवनात विजय हा कधीही सहज मिळत नसतो त्यासाठी संघर्ष करावा लागेल हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र ओमराजे निंबाळकर सतत जनतेच्या सेवेत असल्यामुळे त्यांचा विजय आज तरी पहिल्या टप्प्यात सुखर असलेला दिसत आहे. अशीच परिस्थिती राहिल अशी चर्चा आहे शेवटी जनता जनार्दन आहे त्याचा कौल मान्य केला पाहिजे हेच सांगणे आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post