पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या तत्परतेमुळे कोरोनाची लस लवकर तयार झाली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भावांतर योजनेद्वारे सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई देणार
बार्शी : (सा.संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) भावांतर योजनेद्वारे सोयाबीनचा भाव कमी झाला आहे त्यासाठी सरकार आग्रही असून आचारसंहिता झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार.
कोरोना काळात भारतात मृतांची संख्या दोन ते तीन कोटींच्या आसपास असेल असा अंदाज होता. कारण जेव्हा जेव्हा महामारी आली तेव्हा तेव्हा भारतात त्याची लस येई पर्यंत 30, 40 वर्ष लागली असती मात्र मोदींनी कोरोनाच्या काळात भारतातील संशोधकांना एकत्र केलं आणि भारतीय बनावटीची लस तयार केली. इतकेच नव्हे तर भारतीयांना दोनदा ती लस मोफत देखील दिली. आज आपण सगळे जिवंत आहोत ते मोदीजींच्या लसीमुळे. ती लस नसती तर आपल्या देशाची काय अवस्था झाली असती याची कल्पना करा, त्या प्रत्येक लसीसाठी आपण मोदीजींच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे; असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना केले.
धाराशिव लोकसभा मतदार संघातील माहायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत बार्शी येथे ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत,आमदार राणाजगजितसिंह, आमदार राजेंद्र राऊत, अर्चना पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ही निवडणूक स्थानिक पातळीची नाहीये देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे, देशाला कोण सुरक्षित करू शकेल, पुढील दहा वर्षाच्या भवितव्य कोण घडवू शकतील याचा विचार करून मतदान करा. आज नरेंद्र मोदी यांच्या समवेत भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, रामदास आठवले यांची रिपाइ, रयत क्रांती, जनसुराज्य आदी पक्षांची व्यापक मोठी युती आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत. भाजप सोबतची महायुती ही विकासाची गाडी आहे. ज्याला नरेंद्र मोदी नावाचे मोठे इंजिन लागले आहे. मोदीजींच्या विकासाच्या रेल्वेला अनेक डबे आहेत ज्यामध्ये ओबीसी, अल्पसंख्यांक, तरुण, महिला यांसाठी जागा आहेत तर राहुल गांधी यांच्या गाडीला इंजिनच नाहीये प्रत्येक पक्ष म्हणतात की मीच इंजिन आहे त्यामुळे जर आपल्याला विकास पाहिजे असेल तर अर्चनाताई यांना मोठ्या मताने विजयी करा, म्हणजे बार्शी सहित धारशिवची बोगी मोदींच्या रेल्वे इंजिनला जाऊन लागते आणि ही रेल्वे विकासाकडे निघेल.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या योजनेसाठी आम्ही 24,000 करोड रुपये ठेवले आहेत आचारसंहिता उठल्यानंतर आम्ही ते देणार आहोत. शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. अवकाळी पावसामुळे सोयाबीन खूप मोठ्या नुकसान झाला आहे. त्यांना देखील नुकसानभरपाई दिली जाईल. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही असा शब्द देखील फडणवीस यांनी यावेळी दिला.