जे मोदी लाटेत निवडून आले तेच मोदींवर टीका करतात : मल्हार पाटील यांनी खडसावले
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
जे मोदी लाटेत निवडून आले तेच मोदींवर टीका करतात. त्यांना काहीतरी वाटले पाहिजे.
ज्यांना देशाच्या प्रगतीची, समृद्धीची इच्छा आहे, ते फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. त्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून मागच्या वेळी धाराशिव मधून तुम्ही 'त्या' भंगार चोराला निवडून दिले. अन् हा आता म्हणतो कोण मोदी? खर तर मोदींमुळेच हा माणूस नाटकं करण्याऐवजी लोकसभेत खासदार म्हणून गेला, अशी जहरी टीका महायुतीचे युवा नेता मल्हार पाटील यांनी विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता केली.
धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी उस्मानाबाद येथे आयोजित सभेत मल्हार पाटील बोलत होते.
मल्हार पाटील म्हणाले, मागच्या वेळी येथील कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींसाठी राणाजगजितसिंग पाटील म्हणजे माझ्या वडिलांच्या विरोधात प्रचार केला. मात्र, मोदींच्या नावाने निवडून आलेला उमेदवार आता म्हणतो, कोण मोदी? खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही लोकांनी 2019 मध्ये ओमराजे सारख्या भंगार चोराला पण खासदार केलं. हे केवळ नरेंद्र भाई मोदीं यांच्या आशीर्वादामुळे. अन् तो आज मोदींच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करत आहे.
पुढे बोलताना मल्हार पाटील म्हणाले की,आपण सगळे देवधर्माला मानणारे लोक आहोत. नास्तिक नाही. देवावर, धर्मावर आमचा विश्वास, श्रद्धा आणि आस्था आहे. श्री राम, महादेव, हनुमान हे आमचे आस्थेचे जवळचे विषय आहेत. अन् हा म्हणतो, श्री रामाचे नाव घेवून लागली का नोकरी? अरे जे पाचशे वर्षात इतर कोणाला जमलं नाही ते नरेंद्र मोदींनी करून दाखवले. या देशाच्या पंतप्रधानांनी उघड्या डोळ्यांनी पूर्ण जगाच्या समोर भव्यदिव्य राम मंदिर आपल्याला बांधून दाखवलं.