अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळबागा व शेतीपिकांचे पंचनामे करावेत-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांची मागणी
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
-काल झालेल्या अवकाळी पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक फळबागांचे व शेती पिकांचे नुकसान झालेलं आहे याची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेल निवेदनाद्वारे केली आहे. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागा व अनेक शेती पिकांचे नुकसान झालेलं आहे त्यासोबतच शेतातील गोठे,घरे व जनावरे याची देखील मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला दिलासा मिळावा म्हणून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून घ्यावेत अशी विनंती ही या निवेदनात केली आहे. विशेषतः कळंब व धाराशिव तालुक्यात नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्या ठिकाणी लवकरात लवकर प्रशासनाकडून पंचनामे जर झाले तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल त्या अनुषंगाने प्रशासन व शासन यांच्याकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे असेही या निवेदनात म्हटलं आहे.
अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालं असून काही भागात पॉलिहाऊस देखील उध्वस्त झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती उडवली आहे याकरिता लवकर प्रशासनाने प्रयत्न केल्यास त्यांना दिलासा मिळेल असेही या निवेदनात म्हटले आहे.