निरीक्षणगृह बालगृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
धाराशिव:(सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
धाराशिव येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर संचलित निरीक्षणगृह / बालगृह धाराशिव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन साजरी करण्यात आली. यावेळी कर्मचारी माधुरी हरवले,शिंदे ए.एल,ओम निपाणीकर,प्रशांत मते, यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी भाषण केले. कर्मचारी आशा भिसे, व विद्यार्थी उपस्थित होते.