चर्चेला उधाण मोदीच पंतप्रधान...!
नरेंद्र मोदी हॅट्रिक साधणार...
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) चर्चेला उधाण मोदीच पंतप्रधान अशी सर्वत्र चर्चा होत आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे अशी आज तरी जनतेची इच्छा दिसत आहे. कारण मोदी हेच देशाचे सक्षम पंतप्रधान असल्याचे आपल्याला माहिती जनतेतून पाहायला मिळत आहे.
नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वर्षापासून देशाचे पंतप्रधान आहेत. आपण जर त्यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला तर एक दूरदृष्टी नेतृत्व आपल्या देशाला लाभलेले आहे. गेल्या दहा वर्षात मोदींनी चे कार्य केलेले आहे ,असे कार्य आतापर्यंत कुणीच केले नाही. कारण देशाची शान आज नरेंद्र मोदी आहेत.
जनधन खात्यापासून ते सुकन्या समृद्धी योजना असे अनेक योजना त्यांनी राबविलेल्या आहेत. एक देशासाठी दूरदृष्टी नेतृत्व आपण त्यांच्याकडे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. देशात आज काही जरी टीका करत असले तरी मोदींचे कार्य आज सर्वश्रुत आहे हे सर्वांना सांगण्याची गरज नाही.
जनधन योजना ते सुकन्या समृद्धी योजना...
त्यावेळी २०१४ रोजी मोदी देशाचे पंतप्रधान झाले होते. त्यावेळी असंख्य प्रश्न देशासमोर होते ते पाहणे अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याच लोकांचे बँकेत खाते सुद्धा नव्हते. मात्र त्या सर्व गोष्टींची पूर्तता नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. सुकन्या समृद्धी योजना लहान मुलीसाठी आहेत तर उज्वला योजनेद्वारे शेवटचे व्यक्तीपर्यंत गॅस सिलेंडर देण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केले.
विकासात्मक विकास पुरुष आपण नरेंद्र मोदी यांना म्हटले तरी कदापि वावगे ठरणार नाही. आपण मोदीजींचा सन्मान करतो कारण ती व्यक्ती आपल्यासाठी जीवाचे रान करते. देशांमध्ये आज काही निर्णय घेण्यास विलंब जर लागला असला तरी ते निर्णय घेणे योग्य आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
३७० कलम हटवून काश्मीर मुक्त केले
३७० कलम हे काश्मीर साठी तर धोकादायक होतेच मात्र संपूर्ण देशासाठी सुद्धा धोकादायक होते. आज त्याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
काश्मीरमधील कुठलाही व्यक्ती देशात कुठेही संपत्ती घेऊ शकतो. मात्र भारतातील कुठलाही व्यक्ती काश्मीरमध्ये संपत्ती घेता येऊ शकत नव्हती. मात्र आता काश्मीर मुक्त झाल्यामुळे आपण तिथे मनसोक्त राहू शकतो व तिथे संपत्ती सुद्धा घेऊ शकतो.
जगाच्या मानाने भारतात महागाई कमी !
जगाच्या मनाने आज भारतात महागाई आहे. आपण मान्य करावे लागते, मात्र ती कमी असल्याचा दावा नुकत्याच काही वृत्तपत्रांनी केला होता. कारण आज डिझेलचे पेट्रोलचे भाव वाढले आहे तर दोन वेळेस केंद्र सरकारने भाव सुद्धा कमी केलेले आहेत. त्याचे कारण आहे कोरोनामध्ये जे आपल्या देशाची आर्थिक हानी झाली होती .ती भरून काढण्यासाठी पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहे. त्यामुळे वस्तूच्या किमती सुद्धा वाढलेल्या आहेत.
बेरोजगारीचा विषय पाहिला तर कुठले सरकार संपूर्ण बेरोजगारी संपवू शकत नाही काँग्रेसला ७० वर्षात रोजगार देऊ शकली नाही. दहा वर्षात बेरोजगारी आठवण अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. बेरोजगार कमी व्हावे यासाठी केंद्र व राज्य सरकारने बरेच काही योजना आल्या त्यात बऱ्याच बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले हे मात्र नक्की होय.
पंतप्रधान किसान सन्मान योजना
फायद्याची..
पंतप्रधान किसान सन्मान योजना आहे .शेतकऱ्यांना दर वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. मात्र आजच्या महाराष्ट्र सरकारने अजून सहा हजार वाढविलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नक्की लाभ होत आहे.
अटल पेन्शन योजनेची लाभार्थी वाढले..
अटल पेन्शन योजनेची लाभार्थी वाढलेले आपल्याला दिसून येत आहेत. आपल्याला भविष्य काळात त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होणार आहे
त्यामुळे अटल पेन्शन योजना ही महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे नक्कीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील याबद्दल मुळीच शंका नाही.
बीजेपी ३०० पार..
लोकसभेचे पडघम वाजत असताना भारतीय जनता पार्टीला ही लोकसभेची निवडणूक फार काही अवघड जात असल्याचे दिसत नाही. कारण निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तर नरेंद्र मोदी हे बहुमताने येताना दिसत आहेत. येणारे जून मध्ये नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील असे देखील चित्र आहे.
दक्षिण भारतात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली
दक्षिण भारतात कर्नाटकची सत्ता जरी काँग्रेसकडे गेली असली तरी. कर्नाटक मध्ये सर्वात जास्त खासदार भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहेत. तामिळनाडू मध्ये तर अण्णामलाई या रूपाने भारतीय जनता पार्टीला नवीन चेहरा मिळालेला आहे. ते नक्कीच तिथे कमाल केल्याशिवाय राहणार नाहीत. तर केरळमध्ये अनिल अँटोनी यांच्या भाजप प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीचे लोकसभेत खाते उघडण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे. तर तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीची मतदानाची टक्केवारी आहे बरीच काही सांगून जाते.
नरेंद्र मोदी नक्कीच देशाचे पंतप्रधान होणार हे मात्र नक्की होय. पुढील भागात नरेंद्र मोदींचे नेतृत्वाचे पुढील चर्चा करू आता मात्र बस.