>

भगवंताचे चिंतन करा व पुण्य मिळवा : ह .भ. प महादेव महाराज लोमटे


 भगवंताचे चिंतन करा व  पुण्य मिळवा : ह भ प महादेव महाराज लोमटे

आवसगाव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) भगवंताचे चिंतन करा व पुण्य मिळवा कारण भगवंताच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे की त्या नामस्मरणामुळे मानवाचे जीवन हे यशस्वी होते. कारण आपण वारीत जात असताना जो देवाने देह दिला तो देह आपल्याला घर आठवू देत नाही. तेथे फक्त भगवंताचे नामस्मरण होते संताचे नामस्मरण होते व तेथे आपल्या विषयाचा विसर पडतो. तेच आता आपल्या नितळी ते पैठण वारीमध्ये होत आहे. आज मी इथे सेवा देत आहे ते माझे भाग्य आहे. कारण या वारीमध्ये प्रत्येक पाऊल नामस्मरणाकडे जात आहे याचा मला आनंद आहे. असे आपल्या कीर्तन सेवेत ह .भ. प महादेव महाराज लोमटे  बोलत होते.

     दरवर्षीप्रमाणे नितळी ते पैठण ही वारी संत एकनाथ यांच्या दर्शनाला दरवर्षी जात असते. त्याचे औचित्य साधून २३ मार्च २०२४ रोजी आवसगाव तालुका केज जिल्हा बीड येथे ह.भ.प महादेव महाराज लोमटे यांची गणेश मंदिरात कीर्तन सेवा पार पडली. त्यावेळी नितळी तसेच आवसगाव येथील ग्रामस्थ फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यावेळी त्यांनी ब्रह्मदेव व नाथ महाराजांचा दृष्टांत सांगितला, ज्यावेळी ब्रह्मदेव व नाथ महाराज यांची भेट झाली त्यावेळी ब्रह्मदेव यांनी नाथ महाराजांना म्हणाले की तुम्हाला काय हवं तेव्हा नाथ महाराज म्हणाले आम्हाला फक्त लिनता पाहिजे . तेव्हा ब्रह्मदेवांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना लीनता सापडली नाही तेव्हा ते नाथ महाराजा कडे गेले तेव्हा ते म्हणाले की महाराज आम्हाला लिनता सापडली नाही. तेव्हा नाथ महाराज म्हणाले की तुम्ही जे म्हणालात तीच लिनता आहे. असेही ते म्हणाले.

        तसेच ते हरिनामा विषयी बोलताना पुढे म्हणाले की,

 ज्या ठिकाणी हरिनामाचा घोष चालतो तेथे येम जाऊ शकत नाही.

    तसेच देवाचे गुण सांगताना  यश व  औदार्य याबद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच पुन्हा ते आपल्या वारी या विषयाकडे वळाले ते म्हणाले की वारीतील प्रत्येक पाऊल हे देवाचे नामस्मरण असते. कारण नामस्मरण एवढे पुण्य कुठेच नाही. आज जो आपण अभंग घेतला आहे तो संत तुकोबारायांचा आहे. एवढ्या मोठ्या थोर संताचा अभंगाचा अर्थ मी सांगणार नाही कारण संत महात्मे यांनी लिहिलेला अभंग याचा अर्थ मी सांगणार नाही . कारण संत महात्मे यांच्या अभंगाचा अर्थ सांगण्या एवढा मी मोठा नाही, परंतु त्याची पार्श्वभूमी सांगेन असेही ते म्हणाले व त्यांनी ते पार्श्वभूमी सांगितली व तसेच ते देवा बद्दल सांगताना पुढे म्हणाले की देव हा आपल्या हृदयातच आहे. कारण जो आपल्याला परमार्थ करायचा आहे त्याचे कारण एकच की हृदयातील देव आपल्याला कळवा . मानवाने आपल्या मनात एक स्वार्थ निर्माण केला पाहिजे की मी भगवंताला प्राप्त करीन म्हणजेच स्वार्थ होय. हा स्वार्थ सर्वांनी करावा असेही ते म्हणाले.

त्या कीर्तन सेवेला सर्व ग्रामस्थ वारकरी व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तेथील सर्व ग्रामस्थांनी त्याला भरभरून साथ दिली. 

.

Post a Comment

Previous Post Next Post