शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची संजीवनी बेट वडवळ येथे अभ्यास भेट त्याला भरघोस प्रतिसाद
उमरगा (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
श्री_छत्रपती_शिवाजी_महाविद्यालय, उमरगा येथील #वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल लातूर जिल्ह्यातील वडवळ गावानजीक असलेल्या संजीवनी बेट येथे आयोजित करण्यात आली होती.
वनस्पतींपासून आपल्याला प्राणवायू, अन्न, आणि औषधे मिळतात म्हणूनच त्यांना जीवनाचा आधार मानला जातो. या वनस्पतींचा अभ्यास वनस्पतीशास्त्रात केला जातो. अनेक उपयोगी वनस्पतींना त्यांच्या गुणधर्माच्या अनभिज्ञतेपोटी बहुतेकजण ओळखत नसतात. परंतु त्यांचे त्यांची ओळख करून गुणधर्म, उपयोग जाणून घेतले तर आपल्या अनेक व्याधी दुरुस्त केल्या जाऊ शकतात. असे डॉ. विनोद देवरकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना वनस्पतींची प्रत्यक्ष ओळख व्हावी यासाठी दरवर्षी वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. यावर्षी चाकुर तालुक्यातील वडवळ नागनाथ नजिक असलेल्या संजीवनी बेट येथे भेट देण्यात आली. या बाबतीत अशी आख्यायिका आहे की, रामायणात लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर हनुमान जेंव्हा संजीवनी बुटीसह द्रोणगिरी पर्वत उचलून नेत होते तेंव्हा त्याचा एक तुकडा वडवळ नागनाथ येथे पडला. तेच संजीवनी बेट म्हणून आज ओळखले जाते. या बेटावर शेकडो औषधी वनस्पती असून त्या गोळा करण्यासाठी उत्तरा नक्षत्रात देशभरातून वैद्य मंडळी येथे येत असतात. त्याकाळात येथे यात्राही भरते. या बेटावरील कोणतीही वनस्पती खाल्ली तरी कोणताही अपाय होत नाही, उलट फायदाच होतो असे येथील गावकरी सांगतात. या बेटावर प्रामुख्याने अडुळसा, गुळवेल, सर्पगंधा, पळस, करंज, आघाडा, रानतुळस, लाजाळू, बेल, अर्जुन, सीताफळ, रूचकी, कोरफड, खडक शेपू, काळी मुसळी, लोखंडी, मेढशिंगी, अफुमारी, गुळमारी, शतावरी, अश्वगंधा, इत्यादी औषधी वनस्पती मिळतात.
या शैक्षणिक सहलीसाठी डॉ. व्ही. डी. देवरकर, डॉ. ए. एस. शिंदे, डॉ. पी. एल. सावंत, डॉ. एम एस निर्मळे यांच्या मार्गदर्शनखाली बीएससीच्या विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्या वनस्पतींचे औषधी गुणधर्म समजून घेतले. त्याची काही क्षणचित्रे!