मानवाचे कल्याण करणे हाच संताचा धर्म : आबा महाराज वासकर
कोलेगाव :(सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
मानवाचे कल्याण करणे हाच संताचा धर्म आहे. त्यामुळे धर्म हा व्यापक आहे. धर्माची व्याख्या हे संतच करू शकतात कारण देव व संत सतत एकमेकांशी जोडले गेलेले असतात. तसेच धर्माला आधार असतो तो नामस्मरण कीर्तन प्रवचन यांचा सुद्धा आधार असतो. असे आपल्या संतवाणीतून आबा महाराज वासकर यांनी कीर्तनात केले.
कोलेगाव येथील ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक विष्णू विठ्ठल लोमटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त त्यांनी कीर्तन सेवा केली त्यावेळी ते बोलत होते.
कोलेगाव येथे 19 मार्च 2024 रोजी कीर्तन सेवेत ते बोलत होते त्यावेळी नितळी ,देवळाली कोलेगाव आधी ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच आपल्या कीर्तन सेवेत ते पुढे म्हणाले की, संत हे सदैव धर्मरक्षणासाठी कार्य करत असतात. त्यामुळे समाजातील कुठल्याही सुख दुःखामध्ये संतांचे सतत आचरण होत असते. आज आपण प्रथम पुण्यस्मरण निमित्त येथे कीर्तन सेवा करीत आहोत तेव्हा येथे सुद्धा किर्तन सेवा देवाचे नामस्मरण होत आहे हे देखील महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे धर्माचे रक्षणासाठी संत महात्मे येत असतात. संत महात्म्यांनी कष्ट करून भगवद्गीता ज्ञानेश्वरी लिहिली त्याची किंमत करणे गरजेचे आहे. आज काही लोक संत परमात्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात मात्र ते कदापी यशस्वी होऊ शकत नाहीत. संत महात्म्यांनी समाजाला दिशाभूल केल्याची काही लोक टीका करत असतात मात्र संतांची शिकवणच योग्य आहे असे देखील लोकांनी त्या टीकेला ठणकावून सांगितलेले आहे. नुसती भजन करा नुसती कीर्तन करा तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल असे संतावर वारंवार आरोप झाले. मात्र संतांनी जे तत्त्वज्ञान लिहिले. याचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हाच संतांचे महत्त्व सर्वांना पटणार आहे. मात्र तसे काही होत नाही. कारण संतांचे तत्त्वज्ञान वाचायला कुणाला वेळच नाही जर संतांचे तत्त्वज्ञान जर कोणी आत्मसात केले तर संत महात्मे काय आहेत हे सर्वांना दिसेल असेही ते म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले की मानव कल्याण करणे हाच संतांचा धर्म आहे. त्यासाठीच संत येत असतात. संत हे जंगलामध्ये जाऊन तपश्चर्य करीत असतात. त्या तपश्चर्यातून ते ज्ञान प्राप्त करून घेऊन सर्वांसमोर मांडत असतात .
संताबद्दल ते पुढे म्हणाले की संत धर्माचे रक्षण करत असताना जे धर्मविरोधी कृत्य करतात त्यांचा नाश करत नाहीत. तर त्यांना सुष्ट करतात. त्यावेळी त्यांनी वाल्या कोळी ची जर भेट नारादा ऐवजी देवाशी झाली असती तर याचे सुद्धा उदाहरण दिले तसेच श्रीकृष्ण
हस्तीनापूरला शांतीदूत म्हणून गेले होते तेव्हा दुर्योधनाने त्यांना बंदिस्त करण्याचे ठरविले होते. तेव्हा त्यांनी विराट रूप दाखवले याचा सुद्धा त्यांनी दृष्टांत दिला.
तसेच त्यांनी आपल्या कीर्तन सेवेत संतांचे महत्त्व याला अधिक महत्त्व दिलेले असल्यामुळे कीर्तन सेवेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले व तेथे जमलेले कोलेगाव ,देवळाली नितळी, वानेवाडी गावातील ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. व किर्तन सेवा शांत चित्ताने ऐकून घेतली.