पाणी आणण्यासाठी ११ हजार ५०० कोटीचे बजेट पाहिल्याच कॅबिनेटमध्ये मंजूर केले : पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत
तेव्हा तो सूर्य हा जयद्रथ अशा शब्दात पालकमंत्र्यांनी सभा गाजवली
ढोकी :(सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) जेव्हा सत्तांतर झाले तेव्हा पहिल्या कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मराठवाड्याला पाणी आणण्यासाठी अकरा हजार पाचशे कोटीचे बजेट मंजूर केले त्यामुळे सर्व धाराशिवकारांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. क्या बजेट मधून बोगद्याचे ८० टक्के काम पूर्ण झालेले आहे. फेब्रुवारी अखेर ते पाहण्यासाठी मी धाराशिव जिल्ह्यातील दहा ते पंधरा हजार शेतकऱ्यांना घेऊन जाणार आहे. असे प्रतिपादन आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना केले.
सविस्तर वृत्त असे की, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना ढोकी हा भैरवनाथ शुगर यांनी चालू केला. तेव्हा तेथे शिवसंकल्प कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कारखान्याला भेट दिली व त्यांच्या हस्ते साखरेच्या पोत्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शिवसंकल्प कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. व आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या कार्याचे कौतुक केले. खास करून आरोग्य विभागामार्फत जी त्यांनी योजना राबविल्या त्या खरोखरच महत्त्वपूर्ण आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी शिवसंकल्प कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना ते पुढे म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातील पन्नास एकर चा वीस एकरचा शेतकरी हा केवळ पाणी नसल्यामुळे त्याचे नुकसान होत केव्हा आम्ही त्यांच्यासाठी पाणी आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. व पाणी आणल्याशिवाय शेतकऱ्यांचा विकास होणार नाही, असेही ते म्हणाले. लवादाने जी आपल्याला सात टीएमसी पाणी देण्याचे मान्य केले आहे. ते पाणी कृष्णा भीमा, कृष्णा नीरा स्थिरीकरण माध्यमातून उजनी ते जेऊर बोगदा ते मिरगव्हाण मधून परांडा ला येणार तेथून कळंब, तुळजापूर, धाराशिव, वाशी उमरगा लोहारा व बीड जिल्ह्यातील आष्टी पर्यंत जाणार आहे. जर २०१९ ला जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले असते तर २०२२ लाच सात टीएमसी पाणीआले असते . तसेच आम्ही बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांतीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात सातशे किलोमीटरचे नाला खोलीकरण केलेले आहे.
त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील विरोधकावर टीका करताना ते म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यात प्रस्थापितांनी सहकार बुडविला ,दूध संघ, जिल्हा बँक बुडवली व धाराशिव जिल्हा हा भ्रष्टाचाराच्या खाईत झोकून दिला असेही ते म्हणाले. फक्त कृष्णा खोऱ्याचे पाणी आणण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन द्यायचे व पाच वर्षे त्या विषयावर काहीच बोलायचे नाही. असे देखील प्रस्थापित राजकारणाने केले मात्र आम्ही ते पाणी आणणारच असा विश्वास पालकमंत्री यांनी व्यक्त केला.
सत्तांतर झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनात त्यांनी एक ही दम काफी है याचा उल्लेख करताच सर्व आश्चर्यचकित झाले. त्यामुळे हा कारखाना लवकर सुरू झाला. ते फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे तेरणा शेतकरी साखर कारखाना सुरू झाला असेही ते म्हणाले.
आरोग्य विभागाच्या 22 निर्णय आम्ही घेतलेले आहेत. त्यात सर्वांना मोफत उपचार हा देखील महत्त्वाचा निर्णय ठरला. असेही ते म्हणाले. तसेच धाराशिव शहरासाठी त्यांनी निधीची मागणी केली. तसेच ते शेवटी महत्त्वपूर्ण विषयाला त्यांनी हात घातला तो म्हणजे
(Right to Health) हा कायदा सर्वांसाठी आणणार आहोत असे ते म्हणाले. तसेच हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आहे तो म्हणजे आपल्या आरोग्याचा कायदा होय. म्हणजे आरोग्य जपण्याचा कायदा असणार आहे. असेही ते शेवटी म्हणाले.
त्यांना तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना इतर कारखान्याच्या तुलनेत ५० ते १०० रुपये जास्त ऊसाला भाव देणार असल्याचेही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.