तुमच्याकडे कुणीच राहिले नाही तर शिवसेना पक्ष कसा राहणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एक ते दीड वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १८० कोटी रुपये दिले.
शिवसंकल्प मेळाव्यात विरोधकावर जोरदार टीकास्त्र
ढोकी :(सा संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा ) तुमच्याकडे कोणतीच माणसे राहिली नाहीत मग शिवसेना पक्ष कसा राहील. तुम्ही माझ्या नादी लागू नका तुमच्या सर्व नाड्या माझ्याकडे आहेत हे मात्र विसरू नका. तेव्हा तुम्हीच टीका करता त्याला मी माझ्या कामातून उत्तर देतो. शेवटी मला बोलायला लावू नका. ह्या दाढीनेच तुमची गाडी खड्ड्यात घातली आहे. असे जोरदार टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकावर केलेले आहे. ते ढोकी येथील शिवसंकल्प मेळावा येथे ते बोलत होते.
त्यावेळी व्यासपीठावर भैरवनाथ शुगर चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत, माजी खासदार रवींद्र गायकवाड, आ. ज्ञानराज चौगुले,
सह संपर्क प्रमुख अनिल खोचरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, कार्यकारी संचालक केशव सावंत, धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख दत्ताअण्णा साळुंखे, जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे तालुकाप्रमुख अजित लाकाळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की, मिशन ४८ शिवसंकल्प कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त तेरणा नगर ढोकी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यास आले होते . त्यावेळी ते पुढे म्हणाले की, माझ्यावर जे लोक टीका करतात त्यांना लोकशाही मार्गाने मी माझ्या कामाने उत्तर देत असतो. तुम्ही मात्र बाळासाहेबांचे विचार आत्मसात न करता काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की जर माझी शिवसेनेची काँग्रेस झाली तर हे दुकान बंद करेन. तेव्हा आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहोत. ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेना वाढविली त्यांना आपण संपवण्याची भाषा करत आहात हे मात्र चुकीचे आहे. जर आम्ही ५० आमदारांनी हे पाऊल उचलले नसते तर आतापर्यंत शिवसेनेचे फार मोठे नुकसान झाले असते. जर आम्ही पन्नास खोके घेतले असते तर आपण एवढ्या मोठ्या संख्येने येथे आला असतात का. तेव्हा कार्यकर्ता हा पक्षाचा केंद्रबिंदू असतो. जर उद्या एखादा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला तर मला नक्की आवडेल असेही ते म्हणाले.
विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी वर टीका करतात मात्र त्यांच्याच वंदे मातरम एक्सप्रेस रेल्वेत प्रवास करतात. तेव्हा मोदींची गॅरंटी देखील त्यांना आवडते
परंतु नरेंद्र मोदी यांचे कार्य आवडत नाही तेव्हा नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातून आपण ४५ खासदार महायुतीचे निवडून आणणार आहोत. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे असेही ते म्हणाले. फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री नसून आम्ही काम करणारे आहोत असेही ते म्हणाले.
मी जेव्हा शेतात गेलो तरी अडचण मुंबईला साफसफाई करण्यास गेलो तरी अडचण एवढा राग कशासाठी आहे. असा सुद्धा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोध करणाऱ्यावर केलेला आहे
केला आहे. जर शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तर तुम्हाला काय अडचण होते.
तसेच आपल्या शासनाने शासन आपल्या द्वारे या योजनेद्वारे शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचलो आहे. त्या दृष्टीने त्यांचे कार्य पार पडत आहे तसेच पिक विमा एक रुपयात, ज्येष्ठ नागरिकांना सवलत असे अनेक निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतलेले आहेत. डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य खाते मार्फत ज्या योजना आहेत त्या खरोखरच महत्त्वपूर्ण आहेत. त्यात माता सुरक्षित तर घर सुरक्षित, या योजनेमुळे सर्वांना न्याय मिळाला आहे. महात्मा फुले योजनेत आतापर्यंत फक्त दीड लाख होते ते आपण पाच लाखापर्यंत केलेले आहे.
पहिल्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात अडीच कोटी सुद्धा निधी वापरला नाही तर आपण केवळ एक ते दीड वर्षात १८० कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेले आहेत
त्याचप्रमाणे मराठा आरक्षण विषयी बोलताना ते म्हणाले की कुणबी नोंदी असताना कोणीही प्रमाणपत्र दिले नाहीत, मात्र ते आपण सुरू केलेले आहेत. मराठा समाजाला कायद्यात बसून आरक्षण देणार आहोत.
जी व्यक्ती मराठा समाजाच्या मतावर मोठे झाले तेव्हा त्यांनी मराठा समाजाचा विचार केला नाही. आम्ही जे शब्द देतो तू आम्ही पाहतो. ४५ प्रकल्प आम्ही मंजूर केलेले आहेत. मराठवाडा वॉटर ग्रीड त्यांनी बासनात गुंडाळले होते. मात्र ते आम्ही चालू केलेले आहे
आपण धाराशिव येथील मेडिकल कॉलेज साठी ६७४ कोटी मंजूर केलेले आहेत. मी अठरा ते वीस तास काम करतो त्यासाठी माझी ऊर्जा म्हणजे समोरील शिवसैनिकाची गर्दी होय. तेव्हा त्या ऊर्जेच्या जीवावर मी सरकार स्थापल्यानंतर एक दिवशी सुट्टी घेतली नाही.
तसेच ते शेवटी म्हणाले की येणाऱ्या लोकसभेत आपल्याला महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक खासदार निवडून आणायचे आहेत. तर विधानसभेत सुद्धा महायुतीचे सरकार आणायचे आहे. तेव्हा संघटना वाढवा , गावागावात शिवसेना पोहोचवा. असेही ते शेवटी म्हणाले.
धाराशिव चे पालकमंत्री डॉ .तानाजी सावंत यांनी आपल्या शैलीत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. धाराशिव जिल्ह्यातील काही नेते मंडळींनी सहकार बुडविला.असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच इतर मान्यवरांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चे आगमन होताच. कारखाना परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या हस्ते तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची साखर व त्याचे पूजन करण्यात आले.