>

उपयुक्त जलयुक्त अभियान २.०









उपयुक्त जलयुक्त अभियान  २.०

         उपयुक्त जलयुक्त शिवार अभियान 2.0 मधील कमी तातडीने पूर्ण करा असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कारण  त्याचा फायदा एवढा आहे की त्याची अपेक्षा करणे देखील महत्त्वाचे आहे. पहिल्याच जलयुक्त शिवार अभियानाने महाराष्ट्रात भरपूर फायदा झाला. ज्यावेळी पाऊस काळ होतो त्यावेळेस  तर खरोखरच उपयुक्त ठरते हे सांगणे अत्यंत गरजेचे आहे. जलयुक्त ही काळाची गरज आहे आणि ती शेतकऱ्यांसाठी वरदान आहे.

‌.    जलयुक्त शिवार व नद्यांचे तळ्यांचे खोलीकरण म्हणजेच पाणी वाचवा असे थोडक्यात म्हणणे आहे. ज्यावेळी पाऊस अगदी मोठा होतो त्यावेळी दिलीप शिवार हेच शेतकऱ्यांच्या कामाला येते हे गेल्या वर्षीच्या पावसाने दिसून आलेले आहे. कारण नदी खोलीकरणामुळे पाणी तेथे साचून राहते त्याचे रूपांतर रुद्र अवतारात होत नाही हे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

    माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्वप्नातील जलयुक्त शिवार हे शेतकऱ्यांसाठी खरोखरच वरदानच आहे. यावर्षी महाराष्ट्रात फार मोठा प्रमाणात दुष्काळ आहे व त्याची तीव्रता आता ह्या महिन्यापासून सुरू झालेले आहे तेव्हा जलयुक्त शिवार हे वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. प्रथम जलयुक्त शिवार करण्यात भारतीय जैन संघटनेने देखील फार मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला होता. तेव्हा ह्या वर्षी सुद्धा ती संघटना खोलीकरण करण्यास पुढे येईल हे मात्र नक्की होय. या वर्षात ५५६ तलावातून सुमारे ८३.३९ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

त्यामुळे जवळपास सहा हजार लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा झाला आहे. या योजनेसाठी शांतीलाल मुथा आणि भारतीय जैन संघटने तसेच इतर स्वयंसेवी संस्थाचे सहकार्य घेत आहोत असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले आहे. तेव्हा एवढी प्रगती कुठल्या शासनाच्या कार्यकाळात झाली नाही हे सर्वांना सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

    तेव्हा ज्या व्यक्तीने विकासाची कामे केली त्या व्यक्तीला आपलं मानायला शिका हेच माझे सांगणे आहे. जो व्यक्ती विकासात्मक कार्य करतो त्याच्या मागे उभे राहणे आपले कर्तव्य असते मात्र महाराष्ट्रात जेव्हा २०१९ ला सत्तांतर झाले तेव्हा जलयुक्त शिवाराविषयी वीर दुकाने चौकशी करण्याचे ठरवले मात्र त्यांचे सरकार कोसळणे हे अगदी महत्त्वाचे आहे. खरोखरच जलयुक्त शिवार ही काळाची गरज आहे त्यामुळे मी पुन्हा असे म्हणेन उपयुक्त जलयुक्त शिवार योजना ही यशस्वी कडे जात आहे व त्याला नेण्याचे कार्य सर्वांनी मिळून करावे व सर्वांनी सहकार्य करावे हे मात्र नक्की होय.

 

Post a Comment

Previous Post Next Post