अभिनय सम्राट अशोक सराफ हेच महाराष्ट्राचे भूषण ...
महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अशोक सराफ यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यानिमित्त विशेष लेख
नुकत्याच महाराष्ट्र शासनातर्फे मराठी नाट्य चित्रपट तसेच हिंदी चित्रपटातील अभिनय सम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मंजूर झालेला आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. ज्यावेळी मराठी चित्रपटसृष्टी अडचणीत होती. त्यावेळेस खऱ्याखुऱ्या अर्थाने मराठी चित्रपटाला तारले ते अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांनी होय. दोघेही हास्य कलाकार तसेच चित्रपटातील धडाडीचे नायक असा त्यांचा प्रवास होता. ते दोघे कुठल्याही चित्रपटात असो ते धमालच करायचे. त्याच अर्थाने आज आपण अभ्यास करणार आहोत ते अशोक सराफ यांचा होय.
अशोक सराफ यांच्या बद्दल जर एखादा लेख लिहायचा म्हणून तर संबंध वृत्तपत्र कमी पडेल अशी त्यांची कारकीर्द आहे. कारण एक महत्त्वपूर्ण कलावंत म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो. पांडू हवलदार या चित्रपटाने त्यांना लावलौकिक मिळवून दिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. एक धडाडीचा अभिनय सम्राट म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो. त्यांच्या चित्रपटाची तुलना करायची तर दादा कोंडके यांच्याबरोबर त्यांनी पांडू हवालदार, राम राम गंगाराम, तुमचं आमचं जमलं या चित्रपटात काम केले. पांडू हवालदार ची भूमिका व तुमच आमचं जमलं यामध्ये खलनायकाची भूमिका एकाच व्यक्तीने केलेली आहे असे कोणीही म्हणू शकत नाही. मात्र होय ते दोन्ही भूमिका एकाच व्यक्तीने केलेली आहे. त्याचप्रमाणे राम राम गंगाराम मधील ची व्यक्तिरेखा त्यांनी साकारली ते पाहून आपण सारेच दंग होऊन जातो. कारण मी स्वतः राम राम गंगाराम हा चित्रपट त बऱ्याच वेळेस पाहिलेला आहे. की हा अभिनय करणे अधिक सोपे नव्हते पण ते अशोक मामा यांनी करून दाखविले आहे.
धमाल जोडी, अशी ही बनवाबनवी, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, असे अनेक चित्रपट तर लाजवाबच आहेत. तेथील नायकाची भूमिका व अरे संसार संसार चित्रपटातील खलनायकाची भूमिका ही बरीच काही सांगून जाते. तसा विचार केला तर प्रेम करूया खुल्लम खुल्ला या चित्रपटातील अशोक सराफ यांचा अभिनय हा तर अप्रतिमच आहे. त्याचप्रमाणे धुमधडाका चित्रपटातील जवळकर म्हणून जे त्यांनी काम केले ते तर लाजवाबच आहे. तसेच त्यानंतर तुम्ही करण अर्जुन, चित्रपटातील मुंनशी ची भूमिका तर लाजवाबच आहे. ठाकूर तू गिओ, हा संवाद तर एवढा प्रचलित झाला होता की १९९५ यावर्षी कुणाच्याही तोंडात फक्त हाच शब्द होता. तसेच कोयला चित्रपटातील सुद्धा त्यांची भूमिका एकदम मस्त होती.
कुठे नायक कुठे हास्य कलाकार कुठे खलनायक असा हा अशोक सराफ यांचा प्रवास आजही सुरू आहे. नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील बस कंडक्टर ची भूमिका पाहताना तर माणूस अगदी हसून हसून लोटपोट होऊन जातो. त्यातील एक महत्त्वपूर्ण संवाद मला आठवतो " गाडीत बॉडी बॉडीत गाडी"तसेच दुसरा महत्त्वपूर्ण संवाद आहे . तो म्हणजे "तुम्ही गाडीकडे धावा अन्यथा तुम्हाला चालत गणपतीपुळ्याला जावं लागेल."असे आहेत आमचे अशोक मामा त्यांना परमेश्वर अजून नवनवीन कला करण्याची संधी देओ व त्यांचे आयुष्य असेच वाढत राहो. अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. सर्वांना हसवणारे अशोक जी सराफ यांना महाराष्ट्र शासनाने जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे ठरविले आहे, त्या पुरस्काराची उंची त्यांच्यामुळे वाढणार आहे. तसेच पुढील वर्षी अशोक मामांना पद्मश्री अथवा पद्मभूषण पुरस्कार मिळो यासाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.