प्रशांत शशिकांत मते पी.एल.व्ही यांची विशेष सेलच्या सदस्यपदी नियुक्ती
धाराशिव ( सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव NALSA (legal service to the workers in the Unorganised sector Scheme 2015) असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कायदेशीर सेवा योजना,2015 संदर्भीय मधील निर्देशांची अंमलबजावणी करणे करिता विशेष सेलची स्थापना करण्यात आली. या विशेष सेलमध्ये सदस्य म्हणून अँड.पॅनल लॉयर तेजश्री पाटील, साधना गायकवाड समन्वय, प्रशांत शशिकांत मते पी.एल.व्ही यांची विशेष सेलच्या सदस्य पदी नियुक्ती श्रीमती.अंजू.एस.शेंडे अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिव व वसंत.श्री. यादव सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर धाराशिव यांनी केली.