>

ढोकीचे आंदोलन ठरले महत्त्वपूर्ण : मराठा आरक्षण आंदोलनाचे सर्वत्र कौतुक










ढोकी येथे चौकात सर्व रस्त्यावर मराठा आंदोलन सरसावले  आधी आरक्षण पुन्हा रस्ता.. एकतेचे दर्शन घडले

ढोकी (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेलं सहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. मात्र सरकारने सगेसोयरे कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून मराठा आंदोलन सर्वजण रस्त्यावर उतरलेले आहेत. काल धाराशिव ,सोलापूर नगर येथे फार मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन झालेले होते. त्या अनुषंगाने १६ फेब्रुवारी रोजी ढोकी पेट्रोल पंप सर्व मराठा आंदोलन आक्रमक झालेले असून जोपर्यंत शासन  सगेसोयरे प्रमाणपत्र तोपर्यंत आम्ही हटणार नाही.

       मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झालेला आहे. त्याचेच औचित्य साधून सर्व समाज रस्त्यावर उतरलेला आहे. मराठा समाजाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे शासनाने अंत पाहु नये त्यावर तो मराठा आरक्षणावर सकारात्मक राहण्यापेक्षा सगळे सगेसोयरे प्रमाणपत्र वाटण्यास सुरुवात करा. अन्यथा ही लढाई इथेच संपणार नाही. राजकीय नुकसान शासनाचे होऊ शकते. शासनाची सत्ता देखील जाऊ शकते. कारण मराठा समाजात फार मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झालेला आहे.

        मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असलेला ढोकी येथे दिसून आलेला आहे. येथील चौकामध्ये फार मोठ्या प्रमाणात कळंब रोड   लातूर पुणे हायवे पूर्णतः बंद होता. प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाचा आक्रोश दिसत होत होता. त्यामुळे २० तारखेपर्यंत हे आंदोलन अशीच चालू राहणार होते. मात्र संध्याकाळी कीर्तनानंतर त्या आंदोलनाचा समारोप करण्यात आलेला दिसून येत आहे. त्यानंतर २०तारखेनंतर पुढची आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवणे अत्यंत गरजेचे आहे असे देखील तेथे सांगण्यात आलेले होते. व अंतरवली सराटी येथून निरोप आल्यानंतर आंदोलन हे तात्पुरते मागे घेण्यात आले. शासनाने २० फेब्रुवारीला विधानसभेत कायदा करताना मराठा समाजाला सरसकट कुणबी मधून आरक्षण द्यावे. व सर्वांना न्याय द्यावे अन्यथा त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

    या आंदोलनात ढोकी येथील उपसरपंच अमोल पापा समुद्रे, तसेच संग्राम भैय्या देशमुख, बाबुराव आप्पा समुद्रे, आगतराव काका लोमटे, मुरलीबुबा लोमटे 

 कोलेगाव येथील ह.भ .प महादेव महाराज लोमटे, प्रकाश लोमटे, बालाजी टेकाळे, बालाजी लोमटे  तसेच कावळेवाडी चे पद्माकर कावळे, आधी पंचक्रोशीतील सर्व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post