डॉ. चंद्रभानू सोनवणे स्कूलमध्ये आनंद मेळाव्याला भरभरून प्रतिसाद
*आनंद मेळाव्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद..*
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
धाराशिव शहरातील डॉ.चंद्रभानू सोनवणे स्कूलमध्ये आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालकांनी आनंद घेतला.
या आनंद मेळावा मध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान व चविष्ट पदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी पदार्थाची खरेदी विक्री विविध पदार्थाचा आस्वाद घेण्याचा आनंद सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी खूप उत्साहाच्या वातावरणामुळे लुटला. तसेच पालकांनी पण विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पदार्थाची खरेदी चांगल्या प्रमाणात केली.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विक्रीचे कौशल्य खूप चांगल्या प्रकारे निर्माण झाले..
आनंद मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे सौ पल्लवी गरड तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ.अविनाश कदम, प्रा. दळवी . शाळेचे मुख्याध्यापिका अंजली मोरे. यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा दैनंदिन अभ्यासक्रमा मधील ताण तणाव कमी करण्यासाठी व आनंदाचे वातावरण निर्माण होण्यासाठी या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेज व शाळेचे प्रमुख, श्री श्याम सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक वृंद, कर्मचारी,विद्यार्थी,पालक, यांनी परिश्रम घेतले.. या कार्यक्रमाला पालक वर्गातून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला...