मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यात शिवसंकल्प दौऱ्यानिमित्त नवचैतन्य...
प्रथमच तेरणा सहकारी साखर कारखान्यात मुख्यमंत्र्यांचे होणार आगमन..
ढोकी (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) ७ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते काय बोलणार याकडे सर्व धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.
धाराशिव जिल्हा एक शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून पहिल्यापासून ओळखला जातो. त्यामध्ये धाराशिव जिल्हा हा शिवसेनेवर प्रेम करणारा म्हणून त्याची ओळख असलेला आपल्याला दिसून येत आहे. कारण धाराशिव जिल्हा हा सदैव शिवसेनेच्या मागे राहिलेला आहे. शिवसेना ही धाराशिव जिल्ह्याच्या जीवावर सुद्धा मोठी झालेली त्याचा इतिहासच साक्षी आहे.
भैरवनाथ शुगर संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आरोग्य मंत्री
डॉ तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ समूहाकडे आहे. त्यांच्या ताब्यात कारखाना असल्यामुळे आज कारखान्याला नवसंजीवनी मिळालेली आहे .व तेथील आर्थिक उलाढाल सुद्धा वाढलेली आहे. त्यांच्या एवढ्या परिश्रमामुळे ढोकी व परिसरात रेलचेल सुद्धा वाढलेली आहे.
महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटणार ही जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांची माहिती आहे. कारण गेल्या वेळी सुद्धा ही जागा शिवसेनेने जिंकून दाखवलेली होती म्हणून ही जागा शिवसेनेकडे असणे गैर नाही.
७ फेब्रुवारी २०२४ रोजी मिशन ४८ अनुषंगाने शिवसंकल्प कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे. तेथील मुख्यमंत्री यांची उपस्थिती ही बरीच काही सांगून जाणार आहे. त्यामुळे फक्त आता नाथांचा नाथ एकनाथ असा जयघोष उद्या झाल्याशिवाय राहणार नाही.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धनंजय दादा सावंत, कार्यकारी संचालक केशव सावंत, आमदार ज्ञानेश्वर चौगुले, माजी खासदार रवींद्र गायकवाड, जिल्हा परिषदचे माजी सभापती दत्ता अण्णा साळुंके, धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष सुरज महाराज साळुंके, धाराशिव तालुका प्रमुख अजित लाकाळ, आदि मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यासाठी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा दौरा यशस्वी होऊन कार्यकर्त्यांना योग्य तो कानमंत्र मिळाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की होय.
लोकसभेसाठी धनंजयदादा सावंत हेच सक्षम उमेदवार...
येत्या एक महिन्यात लोकसभेचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यात शिवसेनेकडून धनंजयदादा सावंत यांच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा जोरदार आहे. कारण जनसामान्यांचे व्यक्तिमत्व म्हणून आपण धनंजय दादा सावंत यांच्याकडे पाहत असतो. त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क हा बराच काही सांगून जातो. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी केलेले कार्य हे तर महत्त्वपूर्णच आहे. व भैरवनाथ शुगर च्या माध्यमातून त्यांना प्रशासनाचा देखील अनुभव आहे. त्यामुळे धनंजय दादा सावंत हे लोकसभेचे सक्षम उमेदवार असू शकतात हे मात्र कार्यकर्त्यांच्या मनात आहे असे देखील चित्र दिसत आहे .
आपण जे कार्य करतो ते सदैव जनसामान्यांसाठी आहे असा त्यांचा कार्यकर्त्यांसाठी सदैव कानमंत्र असतो. खरंच एक व्यक्ती म्हणून त्यांनी केलेले कार्य सदैव सर्वांच्या समोर आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभा लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कारण तसा उमेदवार मिळणे हे तर धाराशिव जिल्ह्याचे भाग्य समजले जाणार आहे. तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा प्रचार करून त्यांना लोकसभेत पाठवणे हा एकमेव उद्देश कार्यकर्त्यांचा आहे अशी देखील जनमानसात चर्चा सुरू आहे. तेव्हा प्रामाणिक उद्देश घेऊन धनंजय दादा सतत सामाजिक कार्यात व्यस्त असतात. त्यामुळे तेच लोकसभेसाठी सक्षम उमेदवार आहेत हे सुद्धा तितकेच मान्य करावे लागेल.