*श्री छत्रपती शाहू मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विज्ञान प्रदर्शनास पालकांचा भरभरून प्रतिसाद*
मुरुड (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
मुरुड परिसरात नामांकित असणाऱ्या कै . गोरोबा ( काका ) झाडके यांच्या ध्येयपूर्तीने मार्गक्रमण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय सीबीएसईचे शिक्षण देणाऱ्या श्री छत्रपती शाहू मॉर्डन इंग्लिश स्कूल मध्ये घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनास पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला .
संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक श्री अविनाश (आबा ) मोरे , अध्यक्ष श्री दिपक झाडके, कोषाध्यक्ष प्रा. श्री शंकरराव पाटील, सचिव प्रा .श्री दत्तात्रय जाधव, मार्गदर्शक श्री भुजंगराव पाटील, प्राचार्या सौ . डी . कांचन यांच्या मार्गदर्शनातून हे प्रदर्शन घेण्यात आले .
सदरील प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्या सौ. डी. कांचन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य श्री उमेश कुंभार, समन्वयक श्री रामेश्वर शेटे, समन्वयीका सौ. धनिषा नागराळे, विज्ञान विषयाच्या शिक्षिका शांती मार्डी, अजुर्न नाडे, विनोद सर, राजेश सर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्यानी सर्व विद्यार्थ्यांचे मॉडेल प्रत्यक्ष पाहून त्यांना प्रोत्साहित केले . इतकेच नव्हे तर बदलत्या काळानुरूप विज्ञानामूळे मानवाचे जीवन कसे सुखकारक झाले हे सांगून या प्रदर्शनामुळे अनेक विद्यार्यांच्या विचारांना, कृतीला व त्यांच्या कल्पना शक्तिला या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही वाव दिला आहे असे वक्तव्य त्यांनी पालकांसमोर व्यक्त केले .
यावेळी प्रदर्शन पाहण्यासाठी शाळेतील तसेच शाळेबाहेरील अनेक पालकांनी प्रत्यक्षदर्शी भेट देऊन विद्यार्थ्यांनी बनवलेली विविध प्रकारची प्रात्यक्षिके पहिली जशासतशी व वैज्ञानिकदृष्ट्या आश्चर्यचकित करणारी नाविन्यपूर्ण प्रायक्षिके व त्यावरील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगाचे अभ्यासपूर्ण दिलेले स्पष्टीकरण ऐकून पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले .
यावेळे संस्थेचे सचिव प्रा . श्री दत्तात्रय जाधव व पुणे येथील सॉफ्टवेअर इंजिनियर श्री संतोषजी इंगळे यांनी प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक व शाळेचे कौतुक करून एक नियोजनबद्ध व यशस्वी विज्ञान प्रदर्शन साकारले असे वक्तव्य केले.
पालक वर्गातूनही विद्यार्थी , शिक्षक व शाळेचे कौतूक केले जात आहे.