>

देशात शेअर बाजारात गुंतवणूक व गुंतवणूकदार वाढले!



 ,देशात शेअर  बाजारात गुंतवणूक व गुंतवणूकदार वाढले..!


देशात शेअर बाजारात गुंतवणूकदार संख्या वाढत आहे. भारतातील शेअर्स बाजार हा जगातील मोठ्या बाजारपेठापैकी एक बाजारपेठ असे म्हटले तरी ठरणार नाही. एनएसई बीएसई असे दोन त्याचे प्रकार पडत असतात. NSE (National stock exchange)BSE (Bombay stock exchange) असेही म्हणतात. ह्या दोन्ही मध्ये फरक काही नाही. कारण मी स्वतः शेअर्स घेतो आणि विकतो. एवढं मात्र आहे की नॅशनल स्टॉक व बॉम्बे स्टॉक यामध्ये थोडाफार प्रमाणात फरक आहे. उदाहरणार्थ काही पैशाचा फरक आहे असा काही मोठा फरक नाही.

    भारतामध्ये राकेश झुनझुनवाला यांचे नाव आपण भारतीय शेअर बाजारातील एक क्रांती करणार घेत असतो. त्याच्याच पावलावर पाऊल टाकून आज देशांमध्ये शेअर बाजाराचे जाळे पसरत आहे. त्यातून विविध संस्था या शेअर बाजारचे प्रशिक्षण देत आहेत तर काही संस्था पण त्यांची फसवणूक होत आहे असे काही आपण वृत्तवाहिन्यावर देखील बातम्या ऐकल्या होत्या. आता काही असतो तर भारतात असा एकच देश आहे की तेथे दोन ठिकाणी आपल्याला शेअर्स गुंतवता येतात अथवा विकता येतात. त्यामुळे शेअर्स बाजारात भारतात शेअर्स घेणाऱ्यांची संख्या १७ टक्के झाली आहे अशी माहिती आहे. अशी माहिती नॅशनल स्टॉक एक्सचेंज कार्यकारी अधिकारी अशी चव्हाण यांनी नुकतीच जागा कार्यक्रमात दिली होती.

चौकट

अ) नॅशनल स्टॉक एक्सचेंज व मुंबई स्टॉक एक्सचेंज मध्ये व्यवहार होतात.

१) देशात शेअर बाजारात १७% गुंतवणूकदार.

२) शेअर बाजारात बँक निफ्टी, इंट्राडे, फिनिप्टी असे प्रकार आहेत.

३) त्याचप्रमाणे बिटकॉइनचे देखील भारतात प्रमाण वाढत आहे.

४) त्याचप्रमाणे फॉरेक्स शेअर्स मार्केट वर देखील भारतीयांची गुंतवणूक.

५) बिटकॉइन चा देखील भारतात चंचू प्रवेश 

 अजून बरीच काही माहिती पाहिजे असल्यास गुगल अथवा पुस्तकांचा अभ्यास करूनच व्यवहार करावा जेणेकरून आपण तोट्यात जाऊ नये.

      श्रीकृष्ण लोमटे धाराशिव

Post a Comment

Previous Post Next Post