>

आ. रोहित पवार व किशोरी पेडणेकर यांना ईडीची नोटीस म्हणजे दडपशाहीच :डॉ. प्रतापसिंह पाटील






आ.रोहित पवार  व किशोरी पेडणेकर यांना ईडीची नोटीस म्हणजे ही दडपशाहीच-डॉ.प्रतापसिंह पाटील

धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

आमदार रोहित पवार व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना ईडीने नोटीस बजावली असून सरकारच्या विरोधात काम करणाऱ्या व्यक्तींची ही गळचेपी आहे असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की,भाजप सरकार जे लोक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरतात किंवा सरकारच्या विरोधात आवाज उठवतात त्यांच्या विरोधात कटकारस्थान करून ईडी या संस्थेचा गैरवापर केला जातो आणि सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या व्यक्तीला नामोहरण करण्याचा प्रयत्न केला जातो असाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी महापौर तथा नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या बाबतीत देखील होत आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.

 

Post a Comment

Previous Post Next Post