>

धाराशिव शहरातील संत ज्ञानेश्वर मंदिरात भाजपच्या वतीने स्वच्छता अभियान



 धाराशिव शहरातील संत ज्ञानेश्वर मंदिरात भाजपच्या वतीने स्वच्छता अभियान.. 
 धाराशिव (सा. संत गोरोबा
काका समाचार वृत्तसेवा )

आयोध्येतील नवनिर्मित मंदिरात दिनांक 22 जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडत आहे. या भव्य दिव्य सोहळ्या निमित्त देशातील पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी हा सोहळा दिवाळी सणासारखा साजरा करावा व देशातील गावागावातील शहरातील मंदिरे स्वच्छ करावे असे आवाहन केले आहे त्या अनुषंगाने आज धाराशिव शहरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख श्री नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील स्वच्छता करण्यात आली. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे भाजपा उपाध्यक्ष सुनील काकडे सरचिटणीस प्रदीप शिंदे शहराद्यक्ष अभय इंगळे युवा मोर्च्या जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर, विनोद निंबाळकर, संदीप इंगळे, दाजी आप्पा पवार, लाटे सर, नामदेव नायकल, रोहित देशमुख, अभिजीत काकडे, धनराज नवले, गणेश येडके आदी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post